धोत्राभणगोजी गावातील
गावठाणच्या गगतच्या , स्वतःच्या शेतातील.विहिरीमध्ये एका २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना आज रविवार १३ ऑक्टोबर रोजी उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली. मृतक मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली असून त्याचे नाव ज्ञानेश्वर पितळे असे आहे.
धोत्राभणगोजी परिसरातील गावठाण नजीक असलेल्या ज्ञानेश्वर विद्यालय शाळेच्या समोर शेलसूर बुलढाणा स्त्यावरील पुर्वेस असलेल्या विहिरीमध्ये २५ वर्षीय ज्ञानेश्वर वसंता पितळे याचा मृतदेह स्थानिक नागरिकांना विहिरीच्या पाण्यात.
तरंगतांना आढळून आला. मृतकाच्या कंबरलेला दगड बांधलेला असल्याची माहिती समोर आल्याने शंका-कुशंकांना पेव फुटले आहे. तसेच मृतकाच्या पायामध्ये बुटही तसाच असल्याने नेमके काय घडले, हे अद्यापही कुणाला कळाले नाही. अमडापूर पोस्टे. चे ठाणेदार निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय. टेकाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी चिखली येथे पाठविण्यात आला आहे. युवक दोन दिवसापासून घरी नव्हता त्यामुळे घरचेही त्याचा शोध घेत असल्याची माहिती मिळाली. आहे.युवकाच्या आत्महत्येबाबत तर्कवितर्क होत असून मनोरुग्ण कशाला, कमरेला दगड घालून आत्महत्या का करेल? ही बाबही अतिशय गंभीर असल्याने पोलिस प्रशासनाने सदर प्रकरणाची चौकशी करण्याची गरज असल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.
मन्सूर शहा धोत्रा भनगोजी :—

0
7
4
0
6
1

Leave a comment