देऊळगाव राजा:-(दत्ता हांडे)
देऊळगाव राजा तालुक्यातील मौजे शिवणी आरमाळ येथील अर्जदार,मनोज अण्णा सोनुने,यांचे शेत रस्ता प्रकरणात १४ आक्टोंबर रोजीची स्थळ पाहणी ठेवण्यात आली होती. सदर स्थळ निरीक्षणाचे आदल्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसाने सगळीकडे चिखल झालेला होता आणि शेतकऱ्याचे शेत मुख्य रस्त्यापासून अंदाजे,२.५ किलोमीटर दूर असल्यामुळे व उपरोक्त रस्त्यात चिखल झाल्यामुळे शासकीय वाहन तथा मोटर सायकल सदर शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जात नव्हता त्यामुळे तो शेतकरी हवालदील झाला होता, परंतु नायब तहसीलदार सायली जाधव यांनी तत्परता दाखवत,अर्जदाराच्या बैलगाडीने २.५ किलोमीटर प्रवास करून अर्जदाराचे स्थळ निरीक्षण करण्याची कार्यवाही पूर्ण केली व त्या शेतकऱ्याला न्याय दिला यावेळी मंडळ अधिकारी केदार,अव्वल कारकून उमेश गरकळ, महसूल सहाय्यक किशोर खांडेभराड,या सर्वांनी नायब तहसीलदार सायली जाधव यांना सहकार्य करुन त्या शेतकऱ्याला न्याय दिला आहे तालुक्यातील नागरिकांमध्ये अशी चर्चा चालू आहे की,असे धडाडीचे अधिकारी व कर्मचारी सर्व शासकीय कार्यालयात पाहिजे जेणेकरुन नागरिकांनाचे कामे तत्काळ मार्गी लागेल, तालुक्यातील जनतेतून व शेतकरी वर्गातून महसूल अधिकारी नायब तहसीलदार सायली जाधव व त्यांच्या सहकारी कर्मचा-यांचे कौतुक करत व अभिनंदन करत आहेत तालुक्यात असे कार्यतत्पर अधिकारी लाभले म्हणून तालुक्यातील सर्व नागरिकांनी तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे
Users Today : 11