विधानसभा निवडणूक तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्याची घेतली बैठक

Khozmaster
2 Min Read

बुलडाणा :
भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून जिल्हा प्रशासन देखील निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. ही निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांनी विविध कामांसाठी जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक केली असून त्यांच्या कामाचा सोमवारी त्यांनी आढावा घेतला.

जिल्हाधिकारी यांच्या दालनात झालेल्या या बैठकीला अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, अपर पोलिस अधीक्षक बि.बि.महामुनी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार यांच्यासह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॅा. पाटील यांनी पोस्टल बॅलेट, ईव्हीएम वितरण व्यवस्था कार्यान्वित करावी. कंट्रोल रुम, सर्व हेल्पलाईन क्रमांक, भरारी पथके, स्थिर संनियंत्रण पथके, पोलीस यंत्रणा कार्यान्वित करावीत, माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती, माध्यम कक्ष कार्यान्वित करावे. निरीक्षक (ॲाब्झर्वर) यांच्यासाठी नेमण्यात आलेल्या संपर्क अधिकाऱ्यांनी नियोजन करावे आदी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

कमी मतदान झालेल्या केंद्रांवर मतदानाचा टक्का वाढवा :

लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील ज्या मतदान केंद्रांवर कमी मतदान झाले आहे. त्या मतदान केंद्रांवर मतदानाचा टक्का वाढला पाहिजेत. मतदान वाढविण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत. मतदान केंद्रांवर सोयीसुविधांसह आरोग्य सेवा तयार ठेवाव्यात. दिव्यांग व वृद्धांसाठी मतदान करण्यासाठी सुविधा उपलब्ध कराव्यात. मतदान केंद्रांवर स्वच्छता, पिण्याचे पाणी, प्रतिक्षा कक्ष, बिछायत आदी व्यवस्था संबंधित यंत्रणेने करावी. एकाच ठिकाणी चारहून अधिक मतदान केंद्र असतील अशा केंद्रांवर ॲम्ब्यूलन्स तयार ठेवावी. मतदानाची टक्केवारी वाढेल यादृष्टीने विशेष लक्ष्य ठेवून काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॅा. पाटील यांनी नोडल अधिकाऱ्यांना दिल्या.

 

0 9 4 9 8 0
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *