विधानसभा निवडणुकीत आपल्यासमोर सध्या चार पर्याय

Khozmaster
3 Min Read

बुलढाणा  –  पहिला पर्याय महाविकास आघाडीचा,दुसरा महायुतीचा, तिसरा वंचित बहुजन आघाडीचा आणि चौथा पर्याय म्हणजे स्वतंत्र लढणे आहे. त्यावर काय करायचे ..?

तुमच्या मनात काय आहे, असे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्यभरातून आलेल्या आपल्या कार्यकर्ते व समर्थकांना विचारताच, महाविकास आघाडीसोबत जाण्यास प्राधान्य द्यावे, जर ते सकारात्मक झाले नाही तर सर्व पर्याय आपल्यासमोर खुले आहेत, असे या सर्वांनी तुपकरांना सांगितले. आपली महाविकास आघाडीसोबत सकारात्मक चर्चा सुरू असून, महाविकास आघाडीकडून सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे, असे प्रतिपादन यावेळी तुपकर यांनी याप्रसंगी करून, आणखी काही दिवस ‘वेट अॅण्ड वॉच’ चा सल्ला आपल्या समर्थकांना दिला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज, दि. २२ ऑक्टोबर रोजी राज्यभरातील
कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बुलढाण्यात बोलावली होती. या बैठकीत त्यांनी कोणतीही राजकीय भूमिका जाहीर न करता कार्यकर्त्यांना
सबुरीचा सल्ला दिला.राज्यात शेतकरी चळवळ पुढे नेण्यासाठी तसेच जनसामान्यांच्या समस्यांवर आवाज उठवण्यासाठी रविकांत तुपकरयांनी बिगरराजकीय सामाजिक संघटनेची स्थापना केली आहे. ‘क्रांतिकारी शेतकरी संघटनेची’ घोषणा त्यांनी आज (दि.२२) बुलढाणा येथे झालेल्या राज्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केली. चळवळीचे अस्तित्व कायम ठेवून क्रांतिकारी शेतकरी संघटना महाविकास आघाडीसोबत जाण्यास सकारात्मक असल्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. महाविकास आघाडी सोबत बोलणे झाले कृतिका असून, महाविकास आघाडीकडून सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षादेखील रविकांत तुपकर यांनी या बैठकीत व्यक्त केली. बुलढाणा शहरातील गोलांडे लॉन्स येथे ही बैठक पार पडली. या सघटना तातडीच्या आणि महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या बैठकीत शेतकरी नेते रविकांत तुपकर नेमकी काय भूमिका जाहीर करतात, या याकडे क्रांतिकारी संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून होते. अखेर या मेळाव्यात तुपकर यांनी मोठा निर्णय घोषित केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून तुपकरांना बाजूला केल्यानंतर शेतकरी चळवळ पुढे नेण्यासाठी आपली वेगळी अशी स्वतंत्र संघटना असावी, अशी मागणीराज्यभरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकत्याची होती. त्यानुसार रविकांत तुपकरांनी सर्वांशी चर्चा करून स्वतंत्र संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, तुपकरांनी क्रांतिकारी शेतकरी संघटनेची घोषणा आज बुलढाण्यात झालेल्या राज्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केली. तुपकरांच्या या घोषणेचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. ‘क्रांतिकारी शेतकरी संघटना’ आता राज्यभर अधिक व्यापक पद्धतीने काम करणार आहे. ही संघटना केवळ शेतकऱ्यांपुरतीच मर्यादित राहणार नसून, समाजातील प्रत्येक घटकासाठी ही संघटना काम करणार आहे. बिगर राजकीय सामाजिक संघटना म्हणून ही संघटना राज्यभरात आक्रमकपणे काम करेल, असे रविकांत तुपकरयांनी यावेळी सांगितले.

0 9 4 9 8 0
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *