मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे अखेर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. मनसेने मंगळवारी जाहीर केलेल्या यादीत माहीम मतदारसंघातून अमित यांना उमेदवारी देण्यात आली. मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी मंगळवारी पक्षाच्या ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली.
अमित ठाकरे काय म्हणाले?
मी दादर माहिम भागात लहानपणापासून वाढलो आहे, माझे आई-बाबा इथेच वाढले आहेत. तीन पिढ्या आम्ही इथे जवळून ओळखतो. ऑफिसला मी चालत जातो. अनेक जण मला समस्या सांगतात, मी त्या सोडवतो. त्यामुळे इथल्या लोकांसोबत माझा कम्फर्ट झोन तयार झाला आहे. देवाने मला खूप काही दिलं आहे, त्यामुळे मी काही मागायला जात नाही, असं अमित ठाकरे म्हणाले.
महायुतीकडून परतफेड होणार का?
राज साहेब भूमिका ठामपणे घेतात, ती उपकाराची भावना नसते. त्यांची कधीही परतफेडी इच्छा नसते. ते नेहमी म्हणतात की हे राजकारण आहे, समोरचा माणूस कसा आहे, हे आपण ओळखायला हवं, लोकसभेला त्यांनी मोदींना पाठिंबा दिला. त्यांचे जवळचे मित्र असतील, राणे साहेब किंवा मोहोळ.. त्यांच्यासाठी त्यांनी प्रचार केला, सभा घेतल्या, पण त्यांनी परतफेड करावी ही सवयही नाही आणि इच्छाही नाही. तुमचं राजकारण तुम्ही करा, आमचं आम्ही करु, असं अमित ठाकरे यांनी स्पष्ट केलं.समोर कोणीही उभं राहू दे, शेवटी ही लढाई आहे. एकटं लढून काय फायदा. स्वबळावर म्हणजे स्वबळावर. मी स्वतः राज साहेबांना सांगितलं, की माझ्यासाठी दहा सीट कॉम्प्रोमाईज नाही झाल्या पाहिजेत, असं अमित म्हणाले.समोर कोणीही उभं राहू दे, शेवटी ही लढाई आहे. एकटं लढून काय फायदा. स्वबळावर म्हणजे स्वबळावर. मी स्वतः राज साहेबांना सांगितलं, की माझ्यासाठी दहा सीट कॉम्प्रोमाईज नाही झाल्या पाहिजेत, असं अमित म्हणाले.
वरळीत काय होणार?
वरळीत गेल्यावेळी उमेदवार न देणं ही राज साहेबांची शिकवण, त्यांचे संस्कार, मी समोरच्यांकडून अपेक्षा नाही करु शकत. मी त्यांची शिकवण घेतो. समोरच्यांकडून काय येईल हे माहिती नाही, कदाचित यायचंही नाही. आपण अजून यादी पाहिली नाही, मी साहेबांना कधीही बोललो नाही की मला कुठचा मतदारसंघ द्या, त्यांच्या आधी तुम्ही माझी उमेदवारी जाहीर केलीत, त्यामुळे माझ्या पोटात गोळा आला होता की यादीत नाव नाही आलं तर माझी लाज जाईल
आदित्यंवर पहिल्यांदाच भाष्य
पक्षाला गरज होती. इतके नेते आले, त्यांची मुलं सत्तेत असताना आली. शिवसेनेचं बघू, आदित्यने सत्तेत असताना निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. चांगला निर्णय होता, पण तो सत्तेत होता, जे काही २०१९ मध्ये झालं, जरी त्यांनी भाजपची साथ सोडली, तरी ते सत्तेत बसले आणि मंत्रिपद मिळवलं, आपल्या पक्षाची तशी परिस्थिती नाही. त्यामुळे साहेबांनी तसा निर्णय घेणं आणि माझ्यावर विश्वास टाकणं ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती.