फर्दापूर परिसरात अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाही सपोनि प्रफुल्ल साबळे यांचे आवाहन
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील फर्दापूर परिसरात हातभट्टीची गावठी दारू मोठ्या प्रमाणावर बनवून गाळून विक्री होत असल्याची गुप्त माहिती सहायक पोलिस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांना दि.२१/१०/२४ रोजी माहिती पोलीसांना मिळताच परिसरातील वाघूर नदीच्या पात्रात गावठी दारूच्या हातभट्टीवर धाड टाकली असता. गावठी दारु तयार करणेसाठी-६००० हजाराचे-६० लिटर्स कच्चे रसायन जप्त करून नष्ट करण्यात आले. परिसरात फर्दापूर गांवाजवळील वाघूर नदीच्या पात्रात हातभट्टीची गावठी दारु मोठ्या प्रमाणात टाक्याने फर्दापूर येथील इसम तयार करीत असल्याची माहिती येथील पोलिसांना मिळताच फर्दापूर पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरिक्षक प्रफुल्ल साबळे यांनी स्वतः पोहेकॉ पद्माकर कोळी व्यवसाय नोकरी फर्दापूर यांचे पथक तयार करून गांवाजवळील वाघूर नदीच्या पात्रात धाड टाकली असता त्या ठिकाणी गावठी दारु तयार करणेसाठी लागणारे कच्चे रसायनआरोपी गुलशन समशेर तडवी वय ४१ हा कच्चे रसायन ढवळतांना मिळून आला. धाडीत १५० लिटर्सच्या चार टाक्या-६०० लिटर्स कच्चे रसायन मिळून आले. ६०० लिटर्स कच्चे रसायन-६००० हजार रुपये किंमतीचे होते. फर्दापूर पोलिसांनी जागेवर कच्चे रसायन नष्ट करण्यात आले. पोकॉ पद्माकर कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी गुलशन समशेर तडवी यांच्याविरुद्ध फर्दापूर पोलीस स्टेशन पोव्ही- गुरनं. १३२/२०२४ नुसार मुंबई दारुबंदी अधिनियम-६५ (फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबतचा पुढील तपास सपोनि प्रफुल्ल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनाईक हे करीत आहेत. यापुढे ही गावठी दारुची कारवाई सुरुच राहील असेहि उपनिरीक्षक सुग्रीव चाटे यांनी बोलताना सांगितले आहे
Users Today : 11