चिखली : चिखली विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. श्वेताताई महाले यांनी गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी व गाव भेट दौरा सुरू केला आहे. दरम्यान गावोगावच्या भेठीगाठी दौऱ्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आज, २४ ऑक्टोबरला श्वेताताई चिखली विधानसभा मतदारसंघातील विविध गावांना भेटी देणार आहेत.. सकाळी ९ वाद ता जांब, सकाळी १० वाजता म्हसळा बु, सकाळी ११ वाजता मोंढाळा, सकाळी १२ वाजता कुलमखेड, दुपारी २ वाजता धाड, सायंकाळी ५ वाजता ज्ञानदेवराव बापू ज्यू कॉलेज धाड, या गावांना आमदार श्वेताताई भेटी गाठी घेणार आहेत. गावभेट दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळत असून आता विकासकन्येलाच साथ द्यायची असा निर्धार गावोगावचे मतदार बोलवून दाखवत आहेत…
Users Today : 11