मेहकर : मेहकर विधानसभा मतदारसंघातून उबाठा शिवसेनेने सिद्धार्थ खरात यांना
उमेदवारी दिल्याने शिवसेनेतील असंतोष उफाळून वर आला आहे. शिवसेनेचे जिल्हा संघटक व स्वतः
उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्या डॉ. गोपाल बच्छीरे यांनी खरात यांना उमेदवारी दिल्याबद्दल नाराजी व्यक्त
केली आहे. माझी चूक काय? मी नोकरी सोडून शिवसेनेसाठी सर्वस्व अर्पण केले . विरोधक शिल्लकसेना म्हणून
हिनवत होते तेव्हा शिवसेनेची मशाल आम्ही घराघरात पोहोचवली. ९ आंदोलने केली, ६ वेळा जनतेच्या
प्रश्नांवर उपोषण केले. ६ मेळावे, ३ जाहीर सभा घेतल्या. खासदारांचा गड असलेल्या मेहकरात लोकसभा
निवडणुकीत आम्ही बरोबरीचे मते घेतली .. ही माझी चूक आहे काय? परवा आलेल्या आणि खोक्याने पैसे
ओतणाऱ्या माणसाला तुम्ही तिकीट देता .. मग निष्ठा ही काय शोभेची वस्तू झाली का? असा सवाल डॉ. गोपाल
बच्छीरे यांनी केला आहे. सिद्धार्थ खरात हा आमदार संजय रायमुलकरांचा खूफिया माणूस असा गंभीर
आरोपही डॉ. बच्छीरे यानी केला आहे …
“मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघात झालेल्या सर्वेत तुमचे नाव नंबर १ वर आहे असे मला परवा उद्धव ठाकरे साहेबांनी
सांगितले होते.मात्र काल सिद्धार्थ खरात यांना एबी फॉर्म देण्यात आला … आता शिवसेनेत निष्ठेला काही किंमत राहिली नाही का? निष्ठा
ही शोभेची गोष्ट झाली का?” असेही डॉ. बच्छीरे म्हणाले. शिवसेना वाढीसाठी झटणारे कार्यकर्ते या निर्णयामुळे प्रचंड नाराज आहेत.
शेकडो कार्यकर्त्यांची मला फोन येत आहेत. अपक्ष निवडणूक लढवण्याचा आग्रह कार्यकर्ते धरत आहे असे म्हणत डॉ.बच्छीरे यांनी
बंडाचे संकेत दिले आहेत. सिद्धार्थ खरात हा माणूस आमदार रायमुलकर यांनीच आर्थिक पाठबळ देऊन आमच्याकडे पाठवला
आहे .. तो आमदारांचा खुफिया माणूस आहे असे डॉ. बच्छीरे म्हणाले. दरम्यान मेहकर उबाठा शिवसेनेत आता नाराजी उफाळून येत
असल्याने सिद्धार्थ खरात यांच्यापुढे अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे .. उबाठा शिवसेनेतील ही नाराजी आ. रायमुलकरांच्या
पथ्यावर पडण्याची चिन्हे आहेत …
माझी चूक काय? निष्ठा ही फक्त शोभेची गोष्ट झाली! शिवसेना जिल्हा संघटक डॉ. गोपाल बच्छीरे यांचा सवाल! बंडाचे संकेत दिले;
0
9
4
9
8
0
Users Today : 11
Leave a comment