लोकसभेसारखी ‘त्या ‘ “वनमॅनशोची” पुनरावृत्ती कराल ?तर रिपाईचा कुठलाच पदाधिकारी महायुतीचे काम करणार नाही….. जिल्हाकार्यध्यक्ष बाबासाहेब जाधव

Khozmaster
3 Min Read

बुलडाणा- बुलडाणा जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची २३ आक्टोंबर रिपाई जिल्हा युवाध्यक्ष विजय साबळे यांनी बुलडाणा येथील अन्ना लॅान वर बैठक आयोजीत केली होती त्या महत्वपूर्ण बैठकीचे अध्यक्षस्थानी रिपाईचे जिल्हा महासचिव जेष्ठ नेते मुरलीधर गवई होते प्रमुख उपस्थितीत जिल्हाकार्यध्यक्ष बाबासाहेब जाधव, जिल्हाउपाध्यक्ष भाऊसाहेब वानखेडे, विदर्भ महासचिव विजयराव सपकाळ,युवा जिल्हाध्यक्ष विजय साबळे, लोकसभा प्रमुख जिल्हाउपाध्यक्ष शरद खरात, विदर्भ उपाध्यक्ष भाऊसाहेब सरदार, विदर्भ उपाध्यक्ष संजय वाकोडे होते. यावेळी होऊ घातलेल्या विधानसभा सभेच्या सातही मतदार संघाचा आढावा घेण्यात आला प्रत्येक तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी आपआपले विचार विधान सभेच्या निवडणुकीवर व पक्षाच्या ध्येय धोरणावर मते मांडली. बैठकीस संबोधित करीत असतांना जिल्हाकार्ध्यक्ष बाबासाहेब जाधव म्हणाले की, महायुतीने जर विधानसभेच्या सातही मतदार संघात जर रिपाइं कार्यकर्त्यांना सन्मानपूर्वक व विश्वासात घेतले नाही तर पक्षाचा कोणताही महायुतीच्या बद्दल आदेश असला तरी रिपाईचा स्वाभिमानी, एकनिष्ठ कार्यकरता सातही मतदार संघात महायुतीच्या विरोधात काम करेल असा इशारा दिला. मागील लोकसभेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून या निवडणुकीत महायुतीने रिपाई कार्यकर्त्यांना सन्मानपूर्वक व विश्वास न घेतल्यामुळे रिपाईचे वनमॅनशो अकेलाचल नेता घेवून चालल्यामुळे महायुतीच्या लोकसभेच्या उमेदवाराला पाचही मतदार संघात पीछाडी घ्यावी लागली याही वेळेस महायुतीने जर वनमॅनशो अकेलाचल रिपाईच्या नेत्याला घेवून चालले तर आठवले साहेबांवर प्रेम करणारा व रिपाईचा निष्ठावंत स्वाभीमानी कार्यकरता महायुतीच्या विरोधात उतरेल व महायुतीला पराभावास समोरे जावे लागेल याचा महायुतीच्या सातही उमेव्दारानी विचार करावा व मागील वनमॅनशोची पुनरावृत्ती होऊ नये याची दक्षता घ्यावी. विजय हवा असेल तर रिपाईला विश्वासात घेवूननच आपला विजय होऊ शकतो हा विचार करावा न केल्यास महायुतीला पराभवास समोरे जावे लागेल.

यावेळी महायुतीने मित्र पक्ष रिपाईला राखीव मतदारसंघ मेहकर रिपाईचे एकनिष्ठ जेष्ठ नेते महासचिव मुरलीधर गवई यांना द्यावा असा मागणी रिपाईच्या वरिष्ठ नेत्याकडे या बैठकीत करण्यात आली.या बैठकीत असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय नेते भारत सरकारचे मंत्री रामदासजी आठवले यांचे वर विश्वास ठेवून व युवाध्यक्ष विजय साबळे यांच्या नेतृत्वाखाली बहुसंख्य इतर पक्षाचे कार्यकर्ते यांनी पक्षात प्रवेश घेतला. या बैठकीत बुलडाणा तालुका युवाध्यक्ष अनिल पवार, बुलडाणा शहरध्यक्ष पंकज बंसी गायकवाड, मेहकर युवाध्यक्ष राणा मोरे यांच्या नियुक्त्या करून त्यांचा पुष्पमाला घालून सत्कार करण्यात आला व त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी अजय जाधव, निलेश गायकवाड, अमोल गवई, राणा मोरे, सैयद हारून, भास्कर जाधव, ग.ग. इंगळे, विकास पवार, अनिल पवार, मोहन, नाटेकर, रामदास वानखेडे, राम उबरहांडे, अजय नाटेकर,विलास खरे, प्रल्हाद राजपूत, आकाश पवार, भरत रधवे, तेजराव म्हस्के, समाधान सरदार,खंडाळकर, वाकोडे,पठाण, रमेश पिंपले, विजय भालमोड, प्रदिप मुख्यालय, अरविंद खरात, सिध्दार्थ शिंदे, बालू खरात, गजानन जाधव, संदिप झिने, त्र्यंबक झिने, गोणेश बनसोड या जिल्हाभरातील बहूसंख्य रिपाई पदाधिकारी कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीचे सुत्रसंचलन पंकज गायकवाड तर आभार प्रदर्शन अनिल पवार यांनी केले.

0 9 4 9 8 1
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *