चिखली:-(प्रशांत जैवाळ)
बहुजनांचे प्रेरणा असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेला राजगृहातील आंबेडकरी विचारधारेचे शिलेदार आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास असलेल्या योगेंद्र चवरे यांची मुंबई आंबेडकर भवन येथे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर,समाज भूषण काकासाहेब खंबाळकर यांच्या हस्ते व इतर पक्षाचे पदाधिकारी यांचे उपस्थितीत विदर्भ अध्यक्षपदी निवड करण्यात आली.ते आपल्या निवडीचे श्रेय राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर,सचिव बोधनकर,महाराष्ट्र अध्यक्ष समाज भूषण काकासाहेब खंबाळकर यांना देतात.
या सभेमध्ये सर सेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांनी राज्य कार्यकारिणी बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना समविचारी पक्षाशी चर्चा करून निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. जर समविचारी पक्षाशी युती झाली नाही तर रिपब्लिकन सेना स्वबळावर निवडणुका लढतील.असे आदेश रिपब्लिकन सेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना दिले.उपस्थित सर्व पदाधिकारी व विदर्भातील सर्व जिल्हाध्यक्षांनी आंबेडकर भवन मुंबई येथे योगेंद्र चवरे यांची निवड होताच आनंद व्यक्त केला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
Users Today : 12