अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कडे डझनभर इच्छुक उमेदवारांची रांग त्याचच गायत्री शिंगणेंची भर….!

Khozmaster
3 Min Read
सिंदखेड राजा:-(किरण वाघ)
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात निवडणूकपुर्व गाठीभेटी वाढल्या आहेत . काल पर्यंत ज्यांच्या हाती तुतारी होती त्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे उमेदवारी मागितली असल्याचे समजते.जर भाजपाला आणि शिवसेनेला हा मतदारसंघ सुटला नाही तर हातात घड्याळ बांधण्यासाठी रिघ लागली आहे .मग त्यात गायत्री गणेश शिंगणे कशा मागे राहतील बरे.
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ कोणत्या पक्षाला सुटेल,माजीमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांची भूमिका काय राहील यावर अनेक दिवस खलबते सुरु होती . कार्यकर्त्यांना मात्र ठाम विश्वास होता की डॉ राजेंद्र शिंगणे तुतारीच हाती घेतील.अखेर डॉक्टरांनी देशाचे नेते शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश करीत तुतारी हाती घेतली.शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढविण्यासाठी अनेकजण इच्छूक होते.परंतु डॉ राजेंद्र शिंगणे यांना प्रवेश देऊन शरदचंद्र पवारांनी अनेकांना धक्का दिला.आता ज्यांनी पवार साहेब यांच्याकडे उमेदवारी मागितली होती, त्यापैकी माजी समाजकल्याण सभापती अभय चव्हाण, साखरखेर्डा तालुका मागणीचे समर्थन वसंतराव मगर,गायत्री गणेश शिंगणे यांनी आणि काॅग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य मनोज कायंदे,भाजपाचे जिल्हा युवा सरचिटणीस अंकुर देशपांडे यांनीही उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.शिवसेनेला मतदार संघ सुटला नाही तर माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांच्या नावाची शिफारस दाराकडे अनेकांनी केली आहे.सर्वांनाच वाटते यावेळी परिवर्तन घडवून आणायचे.परंतू मोळी कोण बांधणार ? हा प्रश्न आहे .डॉ राजेंद्र शिंगणे यांना पराभूत करण्यासाठी सक्षम उमेदवाराची गरज आहे . मागिल निवडणुकीत झालेल्या चुका पुन्हा या निवडणुकीत झाल्या तर काय होईल हे सांगण्याची गरज नाही.आज भाजपाकडे डॉ सुनील कायंदे , विनोद वाघ,डॉ.गणेश मांन्टे यांनी उमेदवारी मागितली आहे.९९ उमेदवारांची भाजपाने यादी जाहीर केली . बुलढाणा जिल्ह्यात अगोदरच तिघांचे तिकीट फायनल झाले . त्यात मलकापूर हा मतदारसंघ भाजपाकडे जाण्याची शक्यता आहे.चार मतदार संघ भाजपाकडे गेल्यानंतर तीन मतदार संघ शिल्लक राहिली . त्यात दोन मतदार संघ अगोदरच शिंदे शिवसेना गटाकडे आहे.त्यात बदल होणे नाही.राहिला सिंदखेडराजा मतदार संघ हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे राहिल,यात दुमत नाही.त्यामुळे अनेकांनी मुंबई येथे मुक्काम ठोकले.काही छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी ठाण मांडून आहेत.डझनभर इच्छुकांनी उमेदवारी मागितली असली तरी एकालाच उमेदवारी मिळणार यात शंका नाही.परंतू ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी एकत्र येऊन मोट बांधून काम करण्याची गरज आहे.ओं बी सी उमेदवाराला उमेदवारी मिळाली तर माळी,बंजारा , वंजारी या नेत्यांना एकत्र येणं महत्त्वाचं आहे.त्यात भाजपा , शिवसेना नेत्यांनी एकदिलाने काम करण्याची गरज आहे.हे झाले नाही आणि बंडखोरी झाली तर निवडणूक कठीण आहे.गायत्री शिंगणे यांनी नुकतीच अजित दादा पवार यांची भेट घेतली.परंतू प्रवेश केला नाही.आणि उमेदवारी सुध्दा मागितली नाही.माझी भेट ही वैयक्तिक होती.
 अशी माहिती गायत्री गणेश शिंगणे यांनी प्रसार माध्यमांना बोलतांना दिली.
२९ पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख आहे.पाच दिवसांत काय घडामोडी होतात याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे .
0 9 4 9 8 1
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *