नांदुरा : तालुक्यातील निमगाव हातभट्टी दारू विक्री संदर्भात गोपनीय माहिती मिळताच ठाणेदार विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. जवंजाळ, पो. मानकर, पो. झगडे सपकाळ, यांनी निमगाव येथे 24 ऑक्टोंबर 2024 रोजी हातभट्टी पासून तयार करून दारू विक्रेता हरपाल सिंह, मंगलसिंह चव्हाण त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 प्रमाणे तात्काळ कार्यवाही केली हरपाल सिंह यांच्याकडून मिळालेला माल ‘एक प्लास्टिकच्या कॅन मध्ये वीस लिटर हातभट्टी ची गावठी दारू शंभर रुपये प्रमाणे दोन हजार रुपये तर एक प्लॅस्टिक कॅन किंमत दोनशे रुपये असा एकूण 2200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तसेच नांदुरा तालुक्यातील आंबोडा येथील इसम याबद्दल रित्या विनापरवाना विक्री करण्याच्या उद्देशाने एका थैलीमध्ये 90 एम एल मापाच्या 15 मग देशी दारू टॅंगो पंच शिष्य अंदाजे किंमत 535 रुपये थैली सह हॉटेल महाराणा समोर आढळल्याने पो. राहुल ससाने, विनोद भोजने सुनील सपकाळ यांनी तात्काळ ताब्यात घेऊन श्रीराम लक्ष्मण सातव याच्या विरोधात कार्यवाही केली.

Users Today : 12