डॉ राजेंद्र शिंगणे यांची उमेदवारी अर्ज दाखल, महायुतीचा घोडा कोठे अडला, पंजा मशाल बाद आता घड्याळीचा वाजणार गजर !

Khozmaster
3 Min Read

सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात आज माजीमंत्री तथा आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांनी हजारी समर्थकांच्या उपस्थित आपला
उमेदवारी अर्ज दाखल केला आहे . तर महायुतीचे त्रांगडे कायम दिसत आहे. महायुती मध्ये भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आहे . नेमका हा मतदारसंघ कोणाला सुटतों की घड्याळाचा गजर वाजतो. हे पाहणे अगत्याचे
आहे.

आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या वतीने सिंदखेडराजा मतदार संघाचे आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांनी उमेदवारी अर्ज
दाखल केला . यावेळी संसदरत्न खासदार अमोल कोल्हे यांची उपस्थिती होती . महाविकास आघाडीचे उमेदवार कोण असेल ही
खलबते अनेक दिवस चालली , फोकस फक्त महाविकास आघाडीकडे जास्त होता . महाविकास आघाडीचा उमेदवार शनिवारी
फायनल झाला तरी महायुतीला उमेदवारांची शोधाशोध करावी लागत आहे. त्यात हा मतदारसंघ भाजपाला सुटतो की शिवसेनेला
सुटतो यातच चर्चा सुरू आहे . राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने या मतदार संघात दावा केल्याने नेमका उमेदवार कोणता राहू
शकतो यात तर्क वितर्क काढले जात आहे. भाजपाकडे भाजपा ओ बी सी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ सुनील कायंदे हा चेहरा आहे.
तर भाजपा प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ आणि जिल्हाध्यक्ष डॉ गणेश मान्टे असे तीन तगडे उमेदवार आहेत. कदाचित आपसातील
कुरघोडी मुळे विलंब लागत असेल . तर मागिल दोन निवडणूकीत डॉ शशिकांत खेडेकर यांनी निर्णायक मते घेतल्याने हा
मतदारसंघ शिवसेना गटाला सुटल्यास तगड़ी लढत होऊ शकते . राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे अनेकांनी उमेदवारी
मागितली आहे. परंतू केवळ उमेदवार देऊन चालणार नाही तर तो निवळून आला पाहिजे. या मेरीटवर उमेदवार निश्चित होईल.
त्यात आयात करण्याची पाळी आली तरी चालेल, असे पक्षश्रेष्टीला वाटत असावे. महायुतीत आठ दिवसांपासून चाललेली घालमेल
कार्यकर्त्यांना अस्वस्थ करीत आहे . डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या हातात घड्याळ बांधण्यासाठी अजित पवार तयार आहेत . परंतू
लढेल तर शिवसेना पक्षावर असा काही हट त्यांचा दिसत आहे . डॉ राजेंद्र शिंगणे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे . त्यात सविता
मुंढे यांना उमेदवारी घोषित होऊन महिना झाला, तरी त्यांचा संपर्क पाहावा तसा दिसत नाही . शेतकरी क्रांती संघटणा या मतदार
संघात काय भूमिका घेते याकडेही मतदारांचे लक्ष लागले आहे . रविकांत तुपकर या मतदार संघातून प्रकाश गिते किंवा डॉ दिनेश
गिते यापैकी एकाला रिंगणात उतरवू शकतात . या मतदारसंघात मराठा, वंजारी, बौद्ध, माळी, बंजारा, मुस्लिम आणि इतर
अल्पसंख्याक समाजाची संख्या मोठी आहे . मराठा समाजात डॉ राजेंद्र शिंगणे आणि डॉ शशिकांत खेडेकर हे दोघेच उमेदवार
आहेत. तर वंजारी समाजात डॉ सुनील कायंदे, डॉ गणेश मान्टे, विनोद वाघ, सविता मुंढे, डॉ दिनेश गिते, प्रकाश गिते, प्रा नरेश
बोडखे, मनोज कायंदे ही मातब्बर मंडळी आहेत . निवडून येण्याची क्षमता पाठून उमेदवारी ठरविल्या जाते.

0 9 4 9 8 7
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *