बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघातील तीन हजाराच्या जवळपास मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याकरीत अज्ञात व्यक्तींनी फॉर्म नंबर 7 भरला हे प्रकरण सर्वत्र चर्चेत असल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काँग्रेसकडून हा मुद्दा कॅश कारण्यासाठी विद्यमान आमदार श्वेता महाले यांच्यावर आरोप करण्यात आले. या पार्श्वभूमीवर आता प्रशासन समोर आले आहे. प्रशासनाने प्रसिद्धी पत्रक काढून मतदारांनी संभ्रमित होऊ नये. कोणाचेही नाव मतदार यादीतून वगळण्यात आले नाही आणि येणारही नाही. मतदारांनी निश्चिंत राहावे, असे आवाहन केले आहे. चिखली विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत ऑन लाईन पद्धतीने विशिष्ट मतदारांची नावे वगळण्यात आली. त्यांची संमती न घेता हा घोळ करण्यात आला. यासंदर्भातील तक्रार महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल बोन्द्रे यांनी निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याकडे केली. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाकडेही याची तक्रार केली. प्रशासन आले समोर यासंदर्भात सहायक मतदार नोंदणी अधिकारी डॉ. संतोष काकडे यांनी प्रसिद्धी पत्रक काढून मतदारांनी संभ्रमित होऊ नये. कोणाचेही नाव मतदार यादीतून वगळण्यात आले नाही, असे स्पष्ट केले.
'नागपूर कनेक्शन' असल्याचा आरोप चिखली विधानसभा मतदारसंघात मतदारांचा फॉर्म 7 व फॉर्म 8 ऑनलाईन भरुन त्यांच्या संमतीशिवाय मतदार यादीतून नावे वगळल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे यांनी केला. या सुनियोजित कारस्थानाचे ''नागपूर कनेक्शन' असल्याचा घणाघाती आरोपही बोन्द्रे यांनी केला. यामुळे चिखली मतदारसंघातील वातावरण तापले आहे.
‘फडणवीस यांचे नाव गोवण्याचा केविलवाणा प्रयत्न’
आमदार श्वेता महाले यांनी आघाडीवर टीकास्त्र सोडले. या कथित मतदारयादी घोळात
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव गोवण्याचा कोविलवाणा प्रयत्न होत
आहे. ही केवळ ‘स्टंट बाजी’ आहे. त्यातून त्यांना फारतर प्रसिद्धी मिळेल.
पण मतदान मिळणार नाही, असा टोला सुद्धा आमदार महाले यांनी बोन्द्रे यांना लगावला
आहे. ‘फडणवीसांचे नाव गोवणे केवळ स्टंटबाजी आहे. त्यामुळे महाविकास आघाडी
पराभवाच्या छायेखाली आहे. ते मनाने आत्ताच पराभूत झाले आहेत.
या मानसिक धक्क्यातून सावरता येत नसल्याने ते काहीही बेताल आरोप करतात.
मात्र सत्य समोर आल्यावर तोंडावर पडतात, हा रडीचा डाव आहे अशी टीका प्रत्युत्तर
महाले यांनी केली.
भेदभाव केला नाही
मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. या देशातील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे.
त्यामुळे १०० टक्के मतदान व्हावे, मतदान नोंदणी व्हावी यासाठी आम्ही
कायमच आग्रह धरला आहे. चिखली विधानसभा मतदारसंघात आम्ही नवमतदारांच्या
नोंदणीचे काम केले. त्यावेळी कोणताही भेदभाव आम्ही केला नाही .. कोण
कोणत्या पक्षाचा मतदार आहे याचा विचार नोंदणी करून घेतांना केला नाही.
आम्ही राष्ट्रीय कार्यासाठी पुढाकार घेतला असेही आमदारांनी सांगितले.
Users Today : 18