मंठा :- ( गजानन माळकर पाटील )
मंठा तालुक्यातील रस्त्यालग वीज वितरण कंपनीने विद्युत खांब उभे करण्याचे काम चालू आहे ते काम सार्वजनिक बांधकाम विभाग व वीज वितरण कंपनीचे नियम डावलून ठेकेदाराने रस्त्यालगत साईड पंख्यावर उभे केलेले खांब तात्काळ काढा अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने सा. बा. विभागाच्या उपाभियांत्याकडे दि. १५जानेवारी रोजी निवेदणाद्वारे केली आहे नसता लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात करण्यात येईल अशा ईशारा देण्यात आला आहे.
निवेदनात नमुद केले की रस्त्यालागत विद्युत खांब रोवलेली असून व त्या खांबांमुळे उपघाताचा धोका निर्माण झाला आहे.भविष्यात रोड रुंदीकरण काम झाल्यास ते खांब रस्त्यावर येणार आहेत त्यामुळे अपघाता ची शक्यता नाकारता येत नाही त्या रस्त्यालगत खांब व तारमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे तरी ते काम तात्काळ थांबवून उभे केलेले खांब काढून योग्य त्या अंतरावर रोवून उभे करण्यात यावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात येत आहे.
शासनाच्या दिनांक ९ मार्च २००१ च्या शासन निर्णयानुसार इमारत रेषा व नियंत्रण रेषा याचे अंतर राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग व प्रमुख राज्य मार्ग
प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग, ग्रामीण मार्ग यासाठी कमाल व किमान अंतर हे रस्त्याच्या मध्यापासून साठ मीटर ते पंचवीस मीटर पंधरा मीटर याप्रमाणे ठरवण्यात आलेले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्याअंतर्गत येणाऱ्या मंठा तालुक्यामध्ये अनेक रस्त्यालागत वीज वितरण कंपनीचे पोल उभे करण्याचे काम व त्यावर तारा
ओढण्याचे काम नियमांना डावलून सुरू आहे मात्र
सदर काम करताना वीज वितरण कंपनी व कंपनीचे ठेकेदार हे शासनाच्या संदर्भीय आदेशाची सर्रास पायमल्ली करताना दिसून येत आहे. शासनाचे सर्व
नियम धाब्यावर बसून हे कामे सुरू आहेत.रस्त्याच्या कडेला पोल उभे करताना रस्त्याच्या
पंख्यावर किंवा पंख्या पासून पाच ते सात फूट
अंतरावर पोल उभे केले जात आहेत. सदर पोल उभे केल्यामुळे रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. तसेच सदर पोल अवैधरित्या उभे केले असल्यामुळे या ठिकाणी अपघाताचे व अपघातामध्ये सामान्य वाहनधारकांचे मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे. भविष्यात याच रस्त्यांच्या रुंदीकरणाची कामे करायचे झाल्यास वीज वितरण कंपनीचे अधिकारी हेच पोल काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अंदाजपत्रक सादर करून पैशाची मागणी करतात. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कामाची पाहणी करून तात्काळ सूचना देऊन रस्त्याच्या कडेला अवैधरित्या उभे केलेले व धोकादायक पोल काढण्याचे आदेशीत करावे नसता आपल्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल अशा ईशारा निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे निवेदनावर बाळासाहेब खवणे, आसाराम झोल, ज्ञानदेव काकडे,एकनाथ जाधव, परमेश्वर मगर,शिवाजी जाधव यांच्या सह्या आहेत.