मेहकर प्रतिनिधी –
केंद्र शासनाने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात अचानक मोठी वाढ केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक ताण वाढला आहे. तसेच सिलिंडर नोंदणीचा कालावधीही वाढविण्यात आल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरचे दर तात्काळ कमी करून बुकिंगचा कालावधी कमी करण्यात यावा आणि नागरिकांना गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत व नियमित करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.
यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोणत्याही अटी व शर्तीशिवाय कोरा करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करावे आणि शेतकऱ्यांचा ७/१२ सरसकट कोरा करण्यात यावा, अशी मागणीही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली.
या प्रसंगी मेहकर विधानसभा मतदारसंघाचे पक्षनेते अॅड. अनंतराव वानखेडे, विधानसभा समन्वयक देवानंद पवार, जिल्हा काँग्रेसचे वसंतराव देशमुख, मेहकर तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रदीप देशमुख, काँग्रेस उपाध्यक्ष शैलेश सावजी, डोणगाव जिल्हा परिषद संपर्क प्रमुख विनायकराव टाले, सेवादल सरचिटणीस शैलेश बावस्कर, माजी पंचायत समिती सदस्य डॉ. भरत आल्हाट, अॅड. किशोर धोंडगे, सोशल मीडिया काँग्रेस विधानसभा अध्यक्ष संदिप ढोरे, सरचिटणीस दिलीप बोरे, मिलींद खंडारे, राहूल वानखेडे, श्रीकिसन देशमुख, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष राजाराम वाट, अॅड. गोपाल पाखरे, नितीन वानखेडे, भाऊराव जावळे, गजानन राठोड, नामदेव राठोड, तुकाराम चव्हाण, विजय चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Users Today : 0