महाराष्ट्र :-
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिदे गटाचे नेते एकनाथ शिदे यांच्या गाडीला बॉम्बने उडविण्याची धमकी देणारे ई-मेल मुंबईतील गोरेगाव पोलिस ठाण्यात प्राप्त झाले होते. या प्रकरणी भारतीय दंड संहितेअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर, मुंबई गुन्हे शाखा आणि बुलढाणा पोलिस यांच्या संयुक्त कारवाईत दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. मंगेश अच्युतराव वायाळ (वय ३५) आणि अभय गजानन शिंगणे (वय २२) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरूणांची नावे असून, हे दोघेही देऊळगाव मही, ता. देऊळगावराजा, जि. बुलढाणा येथील रहिवासी आहेत. त्यांना चौकशीसाठी मुंबईत नेण्यात आले असल्याचे पोलिससूत्राने सांगितले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गुरुवार, २० फेब्रुवारी रोजी जीवे मारण्याची धमकी देणारा ईमेल पोलिसांस प्राप्त झाला होता. त्यांची गाडी बॉम्बने उडवणार असल्याचे या ईमेलमध्ये म्हटले होते. दरम्यान, मुंबई पोलिसांनी याबाबतच्या तपासाला सुरुवात केली होती. हा धमकीचा ईमेल बुलढाणा जिल्ह्यातून आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मुंबई पोलिस गुन्हे शाखा व बुलढाणा पोलिसांनी संयुक्त तपास करत देऊळगावमहीतून दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या चौकशीसाठी त्यांना मुंबईला नेण्यात आले असून, लवकरच यामागचे षडयंत्र उघडकीस येण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी देऊळगावमहीतून दोघांना उचलले!

0
6
6
8
3
9

Leave a comment