गोकुळसिंग राजपूत :–(छत्रपती संभाजीनगर)
पाटोदा ;केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्या माध्यमातून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग,महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य विभाग बीड सी एस डॉ अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पाटोदा ग्रामीण रुग्णालयात प्रत्येक महिन्याच्या मंगळवारी बुधवारी सर्व रोग निदान व शस्त्रक्रिया शिबीराचा आयोजन करण्यात येते
सदर शिबिरात ग्रामीण रुग्णालय पाटोदा येथील डॉक्टर अभिषेक जाधव व एम एस सर्जन,डॉक्टर शुभांगी ओमासे भूलतज्ञ यांच्यासह ग्रामीण रुग्णालयातील टीम चांगल्या प्रकारे रुग्णांची सेवा करतात श्रीमती किशोरी डोरले,नागरे प्रियंका,आसमा मुजावर, सिस्टर व कर्मचारी सानप अर्जुन,सुनील लाड, देवराव राख,पवार सोपान, इत्यादी कर्मचाऱ्यांसह पाटोदा ग्रामीण रुग्णालयातील सर्व कर्मचारी रुग्णांना चांगली सेवा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करतात तसेच पाटोदा तालुक्यातील रुग्णांनी कुटुंब नियोजन, सांधेदुखी,हर्निया, अपेनडिक्स,मुतखडा,व इतर शस्त्रक्रियेसाठी बाहेर न जाता कोणत्याही महिन्यातील पहिल्या मंगळवार व बुधवारी आपल्या पाटोदा ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रिया केली जात असल्याने ग्रामीण रुग्णालयाला संपर्क साधीत जावा आशे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ अभिषेक जाधव यांनी केले आहे
Users Today : 18