दहा आठवड्यात दहा लाख जलतारा उभारण्याचा निर्धार जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांची माहिती

Khozmaster
1 Min Read

वाशीम:-जिल्हा प्रतिनिधी 

जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी जलतारा योजना प्रभावी ठरत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात पुढील १० आठवड्यात १० लाख जलतारा तयार करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. आणि उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांनी तालुक्यातील जनुना सोनवळ येथे भेट देऊन ग्रामस्थांना योजनेची माहिती दिली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून जलतारा उपक्रमाचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच अग्रीस्टॅक योजनेतही सर्वांनी फार्मर आयडीची नोंदणी करून घेण्याबाबत आवाहन केले. यावेळी जलतारा खोदणीच्या उपक्रमाचा शुभारंभ पूजन व श्रमदान करून करण्यात आला. जलतारा योजनेंमुळे भूजल पातळी वाढून पाण्याची टिकाऊ उपलब्धता राहणार आहे. शेतीसाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल, पावसाचे पाणी साठवता येईल आणि पाणीटंचाईच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय होणार आहे. याप्रसंगी तहसीलदार वाशीम निलेश पळसकर, तालुका कृषी अधिकारी अतुल जावळे, ग्राम महसूल अधिकारी गावंडे, महसूल मंडळ अधिकारी पांडुरंग मापारी, कृषी सहाय्यक, ग्रामपंचायत अधिकारी आणि पाणी फाउंडेशनचे अध्यक्ष सुभाष नानवटे, पोलीस पाटील संतोष चौधरी उपस्थित होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड, माजी पंचायत समिती सदस्य प्रेमसिंग राठोड यांचे विशेष सहकार्य लाभले.

0 8 9 4 5 2
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *