वाशीम:-जिल्हा प्रतिनिधी
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि तहसील कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन व उष्मालाट प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. या जिल्हास्तरीय कार्यक्रमात आपत्ती व्यवस्थापनाची पूर्ण तयारी, उपाययोजना तसेच पूर, वीज, आग, भूकंप, भूस्खलन, रस्ते अपघात, सर्पदंश, उष्मालाट आणि जलतारा आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.प्रशिक्षण सत्रात तहसीलदार निलेश पळसकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर, प्रास्ताविक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी केले. मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनचे जीवरक्षक दीपक सदाफळे यांनी पूर, आग, प्रथमोपचार, रस्ते व इतर अपघात, वीज, सर्पदंश आणि आपत्ती व्यवस्थापनावर प्रशिक्षण दिले. तसेच शोध व बचाव कार्याची प्रात्यक्षिके सादर केली.पर्यावरण व जलसंधारण यावर पवन मिश्रा यांनी मार्गदर्शन केले. तर, वाहन सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन याबाबत आरटीओ निरीक्षक संजय पल्लेवाड यांनी माहिती दिली. तालुका स्तरावरील अधिकारी, महसूल, पोलीस, आरोग्य, ग्रामविकास, कृषी विभागांचे कर्मचारी, मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, रोजगार सेवक आणि विविध विभागांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या सर्च अँड रेस्क्यू टीमने विशेष योगदान दिले.
Users Today : 18