पोदार स्कूलमध्ये होळी उत्साहात

Khozmaster
1 Min Read

वाशीम:-जिल्हा प्रतिनिधी 

वाईट प्रवृत्तीचा नाश करून सकारात्मक दृष्टीने ठेवावी, हा उद्देश ठेऊन स्थानिक पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये होळी साजरी करण्यात आली.तसेच या निमित्त शाळेत विशेष परिपाठाचे आयोजन करण्यात आले होते. परिपाठाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन, प्रार्थनेने झाली. वर्ग दहावीच्या विद्याथ्यांनी परिपाठाचे नियोजन केले. सिया जाजू हिने प्रतिज्ञा, नकुल दवणे याने सुविचार, भूमी चोपडे हिने आजचा शब्द, अनन्या खंडाळकर हिने आश्चर्यकारक सत्य, प्रज्ञा डफडे हिने बातम्या, श्रावणी पातुरकर हिने होळी सणाचे महत्व, भक्त प्रल्हाद व हिरण्यकश्यपु यांची कथा सांगितली. या प्रसंगी अर्णव ठाकरे, वैभव कांबळे, हरिहर मवाळ, कृष्णा नवघरे, नकुल दवणे, गुंजन लक्षवानी, श्रेया वानखडे, पद्मजा जाजू, भूमी चोपडे, अनन्या खंडाळकर या विद्यार्थ्यांनी होळी नृत्य सादर केले. रोशन इंगोले याने परिपाठाचे सूत्रसंचालन केले. माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका रजनी सावळकर यांनी मार्गदर्शन केले. कला शिक्षक नितीन शेलारे यांच्या मार्गदर्शनात फुलांपासून बनविलेल्या नैसर्गिक रंगाद्वारे कलाकृती कशा प्रकारे तयार करता येऊ शकतात याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखविण्यात आले. या प्रसंगी प्राचार्य आरती डोमकुलवार यांनी होळी सणाची माहिती कळावी, त्या परंपरेमागचा कार्यकारणभाव याबाबत मार्गदर्शन केले.

0 8 9 4 5 2
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *