अकोला:-जिल्हा प्रतिनिधी
वसंत देसाई स्टेडियमवरील स्विमिंग क्लब येथे प्रशिक्षित १६ दिव्यांग जलतरणपटूंची २१ ते २३ मार्च दरम्यान नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय दिव्यांग जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी या जलतरणपटूंचा सत्कार केला.दोन महिन्यांपासून दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र घट यांचे या खेळाडूंना मार्गदर्शन लाभले. जलतरणपटूंमध्ये अर्जुन बोरोवाल, गौरव कळसाकर, कुणाल टेलगोट, ओम् तिवाले, सोहम भुसारे, यश अडबोल, शिवम महाले, अर्णव पवार, शानेश्वरी इंगळे, वैष्णवी देशमुख, नम्रता भारसाकळे, प्रतीक्षा खंडारे, पल्लवी पारिसे, शुभांगी मुंडे, प्राची मोरे यांचा समावेश आहे. यावेळी मास्टर पावर स्विमिंग क्लबचे संचालक योगेश पाटील, प्रशिक्षक दीपक सदाशिव, सुशील कांबळे, प्रमोद खंडारे, दिनेश वाघ, आदी मान्यवर उपस्थित होते.
Users Today : 22