बार्शीटाकळी:-विशेष प्रतिनिधी
तालुक्यातील ९८ हजार ९९३ शिधापत्रिका धारकांनी ई-केवायसी करून आपले हक्काचे स्वस्त धान्य मिळविण्याचा मार्ग सुकर केला. मात्र, अजूनही तालुक्यातील ४२ हजार ८८६ लाभार्थ्यांनी ई-केवायसी न केल्याने त्यांना सरकारी स्वस्त धान्य नकोय का? असा प्रश्न अन्न व नागरी पुरवठा विभागाला पडला आहे.२८ फेब्रुवारी २०२५ ही अंतिम तारीख देण्यात आली होती. मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने रेशन कार्ड धारकांना आणखी ३१ मार्च पर्यंतची मुदत वाढवून देण्यात आली. तरीही लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्याची इच्छा दिसत नाही. येत्या १४ दिवसांमध्ये ई-केवायसी न केल्यास या लाभार्थ्यांना सरकारी धान्याला मुकावे लागण्याची शक्यता आहे. अंत्योदय योजनेचे ७२३५कार्डधारक असून, त्यांची सदस्यसंख्या २४,९६८ आहे.तसेच प्राधान्य गटातील ३०३२३ शिधापत्रिका धारक कुटुंबे असून, १ लाख १६ हजार ९११सदस्य आहेत. अंत्योदय व प्राधान्य गट मिळून ९८ हजार ९९३ एवढी संख्या आहे. सर्वांचेच ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. यातील ९८ हजार ९९३ एवढ्या सदस्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले. तर अजूनही ४२ हजार ८८६ सदस्यांचे बाकी आहे.निर्धारित केलेल्या पात्रता निकषांची पूर्तता करणाऱ्या कुटुंबांना दिली जातात. प्रत्येक प्राधान्य कुटुंबास प्रति सदस्य प्रति महिना ५ किलोग्रॅम अन्नधान्य मिळण्यास पात्र आहे. अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका गरिबांपैकी गरीब कुटुंबांना दिली जातात. – राजेश वझीरे, तहसीलदार, बाशीर्टाकळी .
Users Today : 22