अकोला:-जिल्हा प्रतिनिधी
निसगार्चा समतोल राखणे साठी पशू पक्षांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. दिवसेंदिवस पक्षांची संख्या कमी होत आहे, असे प्रतिपादन खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांनी केले.चिमणी दिवसानिमित्य शिवतेज प्रतिष्ठान तर्फे पक्षांकरिता पाणीपात्र योगसाधकांना वाटप कार्यक्रम नेहरू पार्क येथे आयोजीत करण्यात आला होता. त्या निमीत्य केदारे साहेब बोलत होते. शिवतेज प्रतिष्ठान जनतेचे शारीरीक व मानसीक आरोग्य चांगले ठेवण्याचे कार्य करित असल्यामुळे प्रतिष्ठानचे कौतूक केले. प्रथम प्रास्ताविक करतांना योगगुरू मनोहर इंगळे यांनी स्व. चंद्रभागा उध्दव नाथजी इंगळे यांचे स्मृती पित्यर्थ पाणीपात्र वाटप करण्यात येत असून प्रतिष्ठानच्या कायार्चा आढावा घेतला. कार्यक्रमास बंशलोचण मिश्रा, रामप्रकाश मिश्रा, अनुराधा इंगळे या सर्वांचे हस्ते पाणीपात्र वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जसवंतसिंग मल्ली, अॅड. वामन चौधरी, गजानन इंगळे, पुरुषोत्तम गुप्ता, शिवतेज इंगळे, अतूल पळसपगार, संजय मनतकार तसेच अनुराधा इंगळे, वंदना तायडे, अर्चना माने, अरूणा धुमाळे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. गोविंद जाधव यांनी तर आभार बाळासाहेब काळे यांनी मानले कार्यक्रमाची सांगता शांतीपाठाने करण्यात आली.
Users Today : 22