अकोला:-जिल्हा प्रतिनिधी
रामनवमी शोभायात्रा समितीचे संस्थापक दिवंगत माजी आ. गोवर्धन शर्मा यांनी पारंपरिक पद्धतीने सुरू केलेल्या रामनवमी शोभायात्रेत अकोलेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने स्थानीय राणी सती धाम येथे गत वर्षी शोभायात्रेत सहभागी झालेल्या देखावेकार, भजनी व आखाडे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा गौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. समितीचे सर्वसर्वाधिकारी कृष्णा गोवर्धन शर्मा यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या सोहळ्यात भाजप जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील, समितीचे माजी अध्यक्ष विलास अनासने, रामप्रकाश मिश्रा, शैलेश खरोटे, विहिप बजरंग दलाचे प्रांत सहसंयोजक सुरज भगेवार, विहिप जिल्हाध्यक्ष प्रकाश लोढीया, कोषाध्यक्ष राहुल राठी, प्रकाश घोगलिया, राणी सती धामचे अध्यक्ष जगदीश बाछूका, रा स्व संघाचे अजय नवघरे, हरीश अलीमचंदाणी, महिला समितीच्या माजी महापौर सौ सुमन गावंडे, सौ अर्चना शर्मा, सौ रेखा नालट, सौ पुष्पा वानखडे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम मयार्दा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र व स्व आ. गोवर्धन शर्मा यांच्या प्रतिमा पूजनाने या सोहळ्याचा प्रारंभझाला. समितीच्या वतीने यावेळी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक बजरंग दलाचे सुरज भगेवार यांनी करीत सन १९९०ते १९९२पर्यंतचा अयोध्येतील राम भक्तांच्या कारसेवेचा आलेख सादर करीत रामनवमी शोभायात्रेची माहिती दिली. आपल्या मनोगतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अजय नवघरे यांनी रामनवमी दिनी होणारी राम जन्माची ही महायात्रा सकल जनमानसाची महायात्रा व्हावी असे मनोगत व्यक्त केले. विहिपचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोढीया यांनी आपल्या मनोगतात सर्वांनी श्री रामाच्या एकंदर जीवनाचा आदर्श आपल्या जीवनात घेऊन त्या दृष्टीने मार्गक्रमण करून आपले व समाजाचे कल्याण करावे असे आवाहन केले. यावेळी समितीचे सर्वसेवाधिकारी कृष्णा शर्मा यांनी उपस्थितांना संबोधित करीत महानगरातील प्रत्येक कुटुंबाने यावर्षी या रामजन्म शोभायात्रेत सहभागी होऊन आपली एकता व अखंडता या दृष्टीने प्रदर्शित करण्याचे आवाहन केले. समितीचे नवनियुक्त अध्यक्ष शैलेंद्र उर्फ बंटी कागलीवाल यांनीही आपले मनोगत व्यक्त करीत आपणावर दिलेली अध्यक्षपदाची जबाबदारी आपण निष्ठेने पूर्ण करून यावर्षी चांगले देखावे व झाकी निर्माण करण्याचा कसोशीने प्रयत्न करू असे आश्वासन देत सामजिक भावना कलुषित होऊ नये याची दक्षता ही घेण्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी स्व. लालाजींचा हा वसा सर्वांनी शोभायात्रेच्या माध्यमातून पुढे सुरू ठेवावा यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून राम भक्तांनी या शोभायात्रेत उपस्थित व्हावे असे आवाहन केले. या कार्यक्रमात सौ अर्चना शर्मा यांनी ही मातृशक्तींना संबोधित करीत महानगरातील सर्व मातृशक्तींनी जल्लोषात या शोभायात्रेत सहभागी होऊन आपल्या घरापासून तर नगरापर्यंत सर्व वातावरण राम मय करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात गतवर्षी देखावे, झाकी सादर करणारे राणी सतीधाम, बाल घोडेस्वार बालके, कलाल समाज, रामराजे प्रतिष्ठान, वाल्मिकी समाज मित्र मंडळ, खोलेश्वर क्रांती तरुण मंडळ, तपे हनुमान मंडळ, माळीपुरा मित्र मंडळ, खंडेलवाल वैश्य समाज, उत्तर भारतीय युवा मंच, ज्ञानेश्वरी भजन मंडळ, भारत माता क्रांती आश्रम, राधे राधे महिला मंडळ, योगीराज भजन मंडळ, हनुमान आखाडा अनीकट, श्याम के दिवाने समवेत अनेक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. संचालन विहिपचे जिल्हा मंत्री निलेश पाठक व बाळ बिडवई यांनी तर आभार विभाग संयोजक हरिओम पांडे यांनी मानलेत. यावेळी विहिप विभाग मंत्री संजय दुबे, कोषाध्यक्ष अमर कुकरेजा, उपाध्यक्ष राजु मंजुळकर, अशोक गुप्ता, वसंत बाछूका, सिद्धार्थ शर्मा, जगदिश रायकेश, नविन गुप्ता, संजय अग्रवाल, संदिप निकम, संदीप वाणी, मनोज पाठक, रितेश चौधरी, रोशन जैन, विजय डहाके, प्रताप विरवाणी, आकाश ठाकरे, नितीन जोशी, अरुण शर्मा, डॉ प्रियश शर्मा, संतोष बुरडे, रितेश चौधरी, निलेश नागोसे, मनोज कस्तुरकर, पं हेमंत शर्मा, पं पवन मिश्रा, पंडित संजय तिवारी, गोपाल राजवैद्य, विजय शंकर पांडे, मनीष बाछूका, डॉ. अभय जैन, सुमित शर्मा, रितेश चौधरी, संतोष पांडे, विकी ठाकूर, सुनील कोराडिया, अमित खंडेलवाल, अॅड सौरभ शर्मा, शुभम शर्मा समवेत महानगरातील झाकीकार व बहुसंख्य मातृशक्ती उपस्थित होती.
Users Today : 22