जि. प. शाळा कुटासा येथील शिक्षिका अर्चना ढवळे राज्यस्तरीय उपक्रमशील पुरस्काराने सन्मानित ..!

Khozmaster
2 Min Read

अकोट, प्रतिनिधी :विशाल गवई

महाराष्ट्र राज्य नवक्रांती शिक्षक व पदवीधर संघटना यांच्या वतीने दरवर्षी आपल्या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा गेल्या ११ वर्षांपासून सत्कार करण्यात येतो. यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने कला, क्रीडा, शैक्षणिक, समाजसेवा, पत्रकारिता आणि शासकीय सेवा या सहा क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या राज्यातील मान्यवरांचा राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक तथा राज्यस्तरीय क्रांती योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

जिल्हा परिषद शाळा कुटासा येथे कार्यरत असलेल्या अर्चना ढवळे या पंधरा वर्षांपासून कार्यरत असलेल्या शाळांवर विविध उपक्रम राबवितात. विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, लेझीम पथक,गरबा नृत्य, रांगोळी स्पर्धा,निबंध स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, यांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सतत प्रयत्न करीत असतात जिल्हा परिषद शाळा दिनोडा येथे कार्यरत असताना त्यांनी स्वतः पेंन्टिंग करून ज्ञानरचनावादी वर्ग निर्मिती केली होती. तसेच डिजिटल शाळा उद्घाटनाच्या निमित्ताने काढलेल्या शैक्षणिक रांगोळीचे तत्कालीन जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी विशेष कौतुक करून त्यांना सन्मानित केले होते. तसेच तालुकास्तरीय खेळ व क्रीडा स्पर्धे दरम्यान लेझीम पथकांद्वारे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. जिल्हा परिषद शाळा कुटासा येथे कोरोना काळात दिलेले ऑनलाईन शिक्षक,’शाळा बंद पण शिक्षण सुरु’ या उपक्रमांतर्गत घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना कृती पत्रिकेचे केलेले वाटप,कुटासा येथे राबवित असलेले डेअर टू स्पीक, सामान्य ज्ञानाकडून शब्द संपत्तीकडे,माता पालक मेळावा या उपक्रमांची दखल घेत त्यांना आज संपन्न झालेल्या भव्य अशा राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात सन्मानित करण्यात आले.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवक्रांती शिक्षक व पदवीधर संघटनेच्या राज्याध्यक्ष पद्मावती टीकार तर प्रमुख अतिथी म्हणून अकोला जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रणजीत पाटील, नवक्रांती शिक्षक व पदवीधर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उमेश म्हसाये तसेच विशेष अतिथी म्हणून नुकत्याच इंग्लंड येथे पार पडलेल्या लघुपटाच्या सोहळ्यात जगभरातील १०८ लघुपटांमधून सातवा क्रमांक मिळवणाऱ्या ‘ऑस्करची गोष्ट’ या लघुपटाचे लेखक व दिग्दर्शक रत्नागिरी येथील सुधीर घाणेकर तसेच अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन देशमुख ,मराठवाडा विभागीय अध्यक्ष संजयजी तुपे , नागपूर विभागीय अध्यक्ष मंजुषा चकोले , प्रभात किड्स अकोटचे संचालक मनीष अढाऊ, पदवीधर संघाचे अध्यक्ष अतुलजी अमानकर दांदळे, श्रीकृष्ण तायडे , वसीमोद्दीन इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे बहारदार संचालन श्याम पाठक यांनी केले.

 

0 8 9 4 5 6
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *