अकोला:-जिल्हा प्रतिनिधी
साधना आराधना संगीत अकॅडमी अकोलाच्या वतीने अकॅडमीच्या ६५ महिला, पुरुष कलाकारांच्या समवेत महानगरात कृष्ण अवतारावर आधारित लीला पुरुषोत्तम श्रीकृष्ण ही भक्तिमय संगीतमय कृष्ण नाटिका मोठ्या भक्तीभावात संपन्न झाली. गरजू रुग्णांसाठी अखंड दृष्टीदान करणाऱ्या सेवाश्रयच्या वतीने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरासाठी आयोजित स्थानीय प्रमिलाताई ओक हॉल येथे नुकत्याच संपन्न झालेल्या या नाटिकेचे आयोजन साधना आराधना संगीत अकॅडमीच्या संचालिका सौ संतोष माहेश्वरी यांनी तर नृत्य निर्देशिका सौ दीपिका फाफट यांनी ही नाटिका साकार केली. नाटिकेचा प्रारंभभजनकार अमरचंद जोशी, सौ रेवती जोशी यांच्या हस्ते करण्यात आला.या संगीतमय नाटिकेत समाजातील ६५ महिला पुरुषांनी भगवान श्रीकृष्ण यांच्या अवतार कायार्तील सुंदर प्रसंग झाकी रूपाने साकारून सभागृहात भक्तिमय वातावरण निर्माण केले. ही नृत्य नाटिका बघण्यासाठी महिला पुरुषांनी सभागृहात एकच गर्दी केली होती. या नाटिकेचे पार्श्व निवेदन आनंद जहागीरदार व सीमा राठी यांनी केले. प्रास्तविक सेवाश्रयचे विजयकुमार रांदड यांनी करीत सेवाश्रयच्या दृष्टीदान उपक्रमाची माहिती दिली. या उपक्रमातुन संकलित २ लक्ष रुपये हे सेवाश्रयच्या अखंड मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी उपयोगात आणण्यात येणार असल्याचे सांगितले. संचालन सौ रचना चांडक यांनी तर आभार सुरेश माहेश्वरी व विजयकुमार रांदड यांनी मानलेत. यावेळी बहुसंख्य महिला पुरुष उपस्थित होते.
Users Today : 22