आमदार प्रविण दटके यांच्या उपस्थितीत तक्रार निवारण शिबिरात नागरिकांना दिलासा; प्रशासनाला दिले तत्काळ कार्यवाहीचे निर्देश
नागपूर, मध्य नागपूर:
महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण व्हावे, यासाठी भारतीय जनता पार्टी, मध्य नागपूर तर्फे नझुल, एनआयटी, नगर भूमापन आणि नागपूर महानगरपालिका अंतर्गत विशेष तक्रार निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिराला आमदार प्रविण दटके यांनी खास भेट देत नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला. त्यांनी शिबिरात आलेल्या नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या व त्यांचे तक्रार अर्ज तपासून घेत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले.

या उपक्रमामुळे विविध विभागांच्या प्रतिनिधींशी थेट संपर्क साधण्याची संधी नागरिकांना मिळाली आणि अनेक समस्यांचे तिथेच निराकरण करण्यात आले. आमदार दटके यांनी सांगितले की, “लोकांच्या प्रश्नांना प्राधान्याने उत्तर देणे हीच आमची जबाबदारी आहे.”

नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले असून, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून समाधानकारक सेवा मिळत असल्याचे समाधान व्यक्त केले.
Users Today : 33