चिखली ÷ ” सन्मान कर्तृत्वाचा , जागर स्त्री जागर स्त्री शक्तीचा सन्मान कर्तृत्वाचा पुरस्कार
आ सौ श्वेताताई महाले पाटील यांच्या वतीने चिखली विधानसभा मतदारसंघातील ज्या महिलांनी उत्कृष्ट , आगळेवेगळे व इतरांसाठी प्रेरणादायी कार्य केले अशा नारी शक्तीचा नवरात्रीत नऊ महिलांचा सन्मान करण्यात येत आहे .
आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या संकल्पनेतून त्या अनुषंगाने आजच्या दि 2/10/2022 सातव्या माळेला येथील श्रीमती उषा गोपाल लढ्ढा या कर्तृत्ववान महिलेचा साडी चोळी आणि स्मृतीचिन्ह देवून या नारी शक्तीचा सन्मान करण्यात आला.
जागर स्त्री शक्तीचा सन्मान कर्तृत्वाचा पुरस्कार 2022
पाचवी माळ
*श्रीमती उषा गोपाल लढ्ढा यांचा परिचय*
श्रीमती उषा गोपाल लढ्ढा
जन्मतारीख :- 22 /11 /1975 वय- 37 वर्षे श्रीमती उषा गोपाल लढ्ढा या पूर्वाश्रमीच्या उषा राधाकिसन चांडक. त्यांचे वडील श्री राधाकिसनजी चांडक हे मलकापूर जी. बुलढाणा येथील एका खाजगी कंपनीत नोकरी करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवीत होते. त्यांना दोन मुले व एक मुलगी असा त्यांचा परिवार असून उषाताईचे शिक्षण बी. कॉम. पर्यंत झालेले आहे .
उषाताईचा विवाह चिखली निवासी व्यापारी स्व. गोपालजी लढ्ढा यांचे सोबत झाला. अतिशय आनंदात त्यांचा संसार सुरू होता. त्यांचे संसार वेलीवर चि. ईश्वर व चि. वरूण ही दोन फुले उमलली .सुखी व समाधानी संसाराला अचानक दृष्ट लागली. स्व. गोपालजी यांना दुर्धर अशा कर्करोगाने घेरले व त्यातच 12/ 4 /2020 रोजी त्यांना देवाज्ञा झाली.
स्व. गोपालजींच्या जाण्यामुळे उषाताईवर दुःखाचा व संकटाचा डोंगर कोसळला व्यवसायाचा सर्व व्याप गोपालजी सांभाळत असल्याने उषाताईंना त्याबद्दल काहीही माहीती नव्हते. एवढेच काय तर उषाताईचे स्वतःचे कोणत्याही बँकेत खाते देखील नव्हते. एक ईश्वर नावाचा मुलगा अपंग तर दुसरा वरूण हा दहावी मध्ये शिक्षण घेत असलेला मुलगा, विविध बँकांचे सुमारे 1.25 कोटी कर्ज ,कोरोना महामारी मध्ये बंद असणारा व्यवसाय, कर्ज वसुलीसाठी बँकेचा सुरू असलेला तगादा अशा असंख्य संकटांचा डोंगर उषाताई समोर उभा ठाकला.
परंतु गोपालशेठ हयात असताना ते प्रेमाने उषाताईला ” तू झाशीची राणी हो ” असे म्हणायचे तीच त्यांची शेवटची इच्छा समजून उषाताईने आपल्या संसारासाठी पदर खोचला व नातेवाईकांच्या मदतीने व्यवसायाचा श्री गणेशा केला.
व्यवसायात नवख्या असलेल्या उषाताईने थोड्याच दिवसात व्यवसायातील कौशल्य आत्मसात केले व एक अत्यंत यशस्वी महिला उद्योजक म्हणून चिखली परिसरात त्या पुढे आल्या आहेत. संसार व व्यवसाय सावरत असताना कुटुंबीयांना व दुकानातील कर्मचाऱ्यांना त्यांनी स्व. गोपालजींची जाणीव होऊ दिली नाही. आज उषाताईने एका बँकेची पूर्ण कर्ज परत फेड केली असून दुसऱ्या बँकेची देखील कर्जफेड करण्याची त्यांची तयारी झाली आहे.
अशा पद्धतीने घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर बाहेरील जगाचा व्यवसायाचा कोणताही अनुभव नसणाऱ्या एका आदिमाया स्वरूप असणाऱ्या स्ञी शक्ती श्रीमती उषाताई गोपाल लढ्ढा यांनी अतिशय खंबीरपणे संकटांचा सामना करून एक यशस्वी महिला उद्योजिका म्हणून प्रस्थापित झाल्या आहेत.
हा त्यांचा आदर्श इतर महिलांसाठी प्रेरणादायी आहे.
श्रीमती उषाताईंना त्यांच्या भावी यशस्वीमय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
Users Today : 6