नागपूरमध्ये डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या स्मरणार्थ सीपीएल-४ क्रिकेट प्रीमियर लीगचे भव्य उद्घाटनाने झाली सुरुवात
नागपूर, महाराष्ट्र – नागपूरमध्ये डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या स्मरणार्थ आयोजित सीपीएल-४ (क्रिकेट प्रीमियर लीग) स्पर्धेचे भव्य उद्घाटन सोहळा २२ मे २०२५ रोजी रामनगर येथील मारारटोळी मैदानावर पार पडला. या उद्घाटन सोहळ्याला क्रीडा प्रेमी, मान्यवर अतिथी व विविध संघांचे खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धा २१ मे ते १ जून २०२५ या कालावधीत उत्साहात होत आहे. यामध्ये दिवंगत अमोल जिचकार चॅलेंजर ट्रॉफीचा देखील समावेश आहे. श्री नरेंद्र जिचकार यांच्या नेतृत्वाखाली या लीगचे आयोजन करण्यात आले आहे.
दररोज सायंकाळी रंगलेल्या सामन्यांनी प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन होत आहे. विजेत्या संघासह उपविजेते व इतर खास पारितोषिक विजेते खेळाडूंना रोख बक्षिसांसह गौरवण्यात करण्यात येणार आहे.

विजेता संघ ₹१,००,००० चे रोख बक्षीस देण्यात येणार आहे , तर उपविजेत्याला ₹५०,००० आणि दुसऱ्या उपविजेत्याला ₹२५,००० चे बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय ‘मॅन ऑफ द सिरीज’, ‘सर्वोत्तम फलंदाज’, ‘सर्वोत्तम गोलंदाज’ आणि अंतिम सामन्यातील ‘मॅन ऑफ द मॅच’ अशी विशेष पारितोषिकेही देण्यात येणार आहे.
सर्व सामन्यांचे थेट अपडेट्स BAS YouTube चॅनल आणि CricHeroes प्लॅटफॉर्मवर लाईव्ह प्रसारित होणार आहे.
Users Today : 22