आमदार संदीप जोशी यांच्या कार्यालयात शासकीय योजना व नागरिक सेवा केंद्र शिबिराचे उद्घाटन
नागपूर, 10 जून 2025 :
नागपूर शहरातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळावा आणि त्यांच्या समस्या तात्काळ सोडवाव्यात, या उद्देशाने आमदार संदीप जोशी यांच्या कार्यालयात शासकीय योजना व नागरिक सेवा केंद्र शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराचा उद्घाटन सोहळा बुधवार, दि. 11 जून 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता प्लॉट नं. 170, बँक ऑफ इंडिया हॉलच्या बाजूला, आर.पी.टी.एस. रोड, लक्ष्मीनगर, नागपूर येथे होणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0712 2990720 दिला आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री मा. ना. डॉ. श्री. पंकजजी भोयर असतील. तसेच, भाजप नागपूर महानगरचे शहर अध्यक्ष मा. ना. श्री. दयाशंकरजी तिवारी यांचीही उपस्थिती लाभणार आहे.
या शिबिरात नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया, तसेच तात्काळ सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. नागपूरकरांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनीकेले आहे.

Users Today : 27