हास्य योगा क्लब तर्फे सरस्वती नगर, एन.आय.टी. गार्डनमध्ये योग दिन उत्साहात साजरा

Khozmaster
3 Min Read

हास्य योगा क्लब तर्फे सरस्वती नगर, एन.आय.टी. गार्डनमध्ये योग दिन उत्साहात साजरा

नागपूर, 21 जून: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त हास्य योगा क्लब, सरस्वती नगर यांच्या वतीने एन.आय.टी. गार्डन, हनुमान मंदिर परिसरात भव्य योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी 6.30 वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष राजपालसिंग बैस होते, तर प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती ठवकर आणि श्रीमती अर्चना श्रीरसागर उपस्थित होत्या. अतिथींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन सिद्धार्थ कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अनंत गुंडलवार यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाची सुरुवात “मानवजन्म या योग गीताने” करण्यात आली. यानंतर “योगासन हा मंत्रच मोठा” या गीताचे सादरीकरण श्रीमती रेश्मा लाखे आणि इतर महिला सदस्यांनी केले. महिला वर्गातर्फे सूर्यनमस्कार, ताडासन, वृक्षासन, मयूरासन, त्रिकोणासन इत्यादी योगासने सादर करण्यात आली. श्रीमती निशा मॅडम यांनी म्युझिकल योगाचे सादरीकरण करून उपस्थितांची वाहवा मिळवली.

पुरुष वर्गातर्फेही त्रिकोणासन, कटीवक्रासन, ओंकार गजर, शेर की दहाड अशा विविध योग प्रात्यक्षिकांचा समावेश होता. वासुदेव मेश्राम आणि केवलराम हेमणे यांनी योगाचे महत्त्व व फायदे यावर मार्गदर्शन केले. अशोक शहारे यांनी “ये कौन चित्रकार” हे सुंदर गीत सादर करून वातावरण भारावून टाकले.

अध्यक्षीय भाषणात राजपालसिंग बैस यांनी भारतीय प्राचीन संस्कृतीतील योगाचे महत्व स्पष्ट करताना सांगितले की, “योग हा प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा भाग व्हावा, हीच काळाची गरज आहे. उत्तम आरोग्यासाठी योग आवश्यक आहे.”

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रामकृष्ण बांगडे, विजय लांजेवार, जॉन गायगोले, अरुण कोहाड, विजू ठवकर, सुरेश ताकोद, सुरेश बोरकर, भास्कर फुकटकर, गौतम वरघट, रईश तरवटकर, दिलीप राऊत, भारत मंचमवार, ज्ञानेश्वर ठाकरे, माणिक झाडे, ए.पी.सिंग, लिलाधर ढुंमणे, सुधाकर भिसिकर, विनायक मस्के, राजू रामटेककर, अशोक निमजे, भास्कर रणदिवे, धनराज बर्वे, तितरमारे, ज्ञानेश्वर माहुले, पेठेकर साहेब व इतर कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभला आणि योग दिनाचा उत्सव आनंदात पार पडला.

“टॉप ट्रेंडिंग ख़बरें”

👉 स्मार्ट शौचालय में अवैध वसूली — BJP पदाधिकारी गोपाल नगदीया ने NMC की पोल खोली, वीडियो वायरल

👉 डमी स्कूलों का खेल खत्म! CBSE की सख्ती के बाद अब बिना नियमित उपस्थिति वाले छात्र 12वीं बोर्ड में नहीं बैठ पाएंगे — नागपुर में भी कोचिंग क्लास का बड़ा खुलासा, प्रशासन बना मूकदर्शक

0 9 4 6 8 7
Users Today : 37
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *