जनतेची दिशाभूल व साखरेचा प्रलोभन — शिवसेनेचा संतप्त इशारा; रेशन दुकानदाराचा परवाना रद्द करण्याची जोरदार मागणी
अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना निवेदन सादर; नियमभंग करणाऱ्या रेशन दुकानांवर कारवाईची मागणी
नागपूर (प्रतिनिधी):
दक्षिण नागपूरात रेशन दुकानदारांकडून होणाऱ्या नियमबाह्य वाटपावर शिवसेनेने आज कडक भूमिका घेतली. शिवसेना दक्षिण नागपूरच्या वतीने विधानसभा संघटक विशाल कोरके यांच्या नेतृत्वात अन्नधान्य वितरण अधिकारी काळे साहेब यांना सविस्तर निवेदन सादर करून जनतेची दिशाभूल करणाऱ्या आणि साखरेचा प्रलोभन देणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
शिवसेनेचे पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या निवेदनात म्हटले आहे की, “दक्षिण नागपूरातील अनेक रेशन दुकानांतून नागरिकांना नियमानुसार धान्य देण्यात येत नाही. त्याऐवजी काही दुकानदार गहू आणि तांदळाऐवजी साखरेचे वाटप करत आहेत. शासनाकडून साखरेचा पुरवठा होत नसताना ती कुठून येते, याची चौकशी होणे आवश्यक आहे. साखरेच्या बदल्यात नागरिक जे धान्य नाकारतात, त्याचा वापर दुकानदार काय करतात, हेही तपासले पाहिजे.”
शिवसेनेने या प्रकाराला “जनतेची सरळ दिशाभूल” असे ठरवत संबंधित दुकानदारांचे रेशनिंग परवाने तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. याचबरोबर, प्रत्येक रेशन दुकानाबाहेर तक्रार नोंदविण्याच्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक स्पष्टपणे लावण्याची मागणीही करण्यात आली.
अधिकाऱ्यांनी जर याबाबत तत्काळ आणि ठोस कारवाई केली नाही, तर शिवसेना दक्षिण नागपूरच्या वतीने जनहितार्थ आंदोलन छेडण्यात येईल आणि रेशन दुकानांवर धाडी टाकण्यात येतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या निवेदन प्रसंगी धम्मा सोनटक्के, नीलिमा शास्त्री, राकेश भोंदले, उज्वला उंबरे, नलिनी सदावरती, पंकज ढोबळे, निरंजन नाकाडे, सोनाली उंबरे, उज्वला शंभरकर व आरती शर्मा आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📰 अगर आपके पास कोई स्थानीय खबर, फोटो या वीडियो है, तो कृपया हमें भेजें:
📲 WhatsApp नंबर: 8975950362
“टॉप ट्रेंडिंग ख़बरें”
पढ़ने के लिए लिंक पर क्लिक करें।”
👇👇👇👇👇👇👇👇👇
