मातोश्री नथियाबाई विद्यालयाच्या सभापतीपदी प्राध्यापक डॉक्टर कुलदीपसिंह राजपूत यांची निवड…

Khozmaster
1 Min Read

शिवदास उखर्डा सोनोने तालुका प्रतीनिधी जळगाव जामोद जळगाव जामोद तालुक्यामधील नामांकित विद्याभारती शैक्षणिक संस्था अमरावती द्वारा संचालित सुनगाव येथील मातोश्री नथियाबाई माध्यमिक विद्यालयाच्या सभापतीपदी प्राध्यापक डॉक्टर कुलदीपसिंह दर्यावसिंह राजपूत यांची निवड विद्याभारती संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब शेखावत यांनी केली आहे. तत्कालीन सभापती स्वर्गवासी दर्यावसिंह राजपूत यांच्या अकाली निधनाने मातोश्री नथियाबाई विद्यालयातील सभापतीपद हे गेल्या एक वर्षापासून रिक्त होते. त्या पदावर विद्याभारती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब शेखावत यांनी स्वर्गवासी दर्यावसिंह राजपूत यांचे चिरंजीव प्राध्यापक डॉक्टर कुलदीपसिंह राजपूत यांची सभापती पदी वर्णी लावली. प्राध्यापक डॉक्टर कुलदीपसिंह राजपूत हे आंतरराष्ट्रीय स्थलांतर आणि विकास संस्थेत वरिष्ठ संशोधक असून त्यांनी युवकांवर पीएचडी पूर्ण केली आहे तसेच ते शिक्षण प्रेमी आहेत.. त्यांच्या या निवडीबद्दल रावसाहेब शेखावत आणि संस्थेचे इतर पदाधिकारी तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय इंगळे, शिवदास सोळंके, अढाव सर,फोलाने सर,घोटेकर मँडम, यांच्यासह अन्य शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्राध्यापक कुलदीपसिंह राजपूत यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले…

0 9 4 8 9 3
Users Today : 65
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *