धामणगाव रेल्वे प्रतिनिधी
धामणगाव रेल्वे येथील माहेश्वरी भवन येथे मराठा कलार समाजाचे महासंमेलन व युवक-युवती परिचय मेळावा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला आमदार प्रताप अडसड उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
या प्रसंगी अध्यक्षस्थानी भगवान डोहळे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून नामदेव जमईवार, राजेश चवरे, पालकचंद सेवईवार, दिलीप सुर्यवंशी, नरेंद्र धुवारे उपस्थित होते. मेळाव्यात सुमारे ३०० युवक-युवतींनी परिचय दिला.
या वेळी जिल्हा मजूर संघाच्या अध्यक्षपदी नियुक्त झालेल्या माधव शेंडे यांचा आमदार अडसड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार विनोद धूवे व माधव शेंडे यांनी मानले.
आमदार अडसड म्हणाले की, “विदर्भातील कलार समाज भाजपच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभा राहिला आहे. नगरसेवक ते वरिष्ठ पदांपर्यंत या समाजातील कार्यकर्त्यांनी पक्षाचे बळ वाढवले आहे.”
यावेळी त्यांनी “मतदारसंघातील पहिले कलार समाज भवन कावली येथे उभारण्यात येईल,” अशी घोषणा केली.
Users Today : 27