अंजनगाव सुर्जी प्रतिनिधी
स्थानिक प्रसिद्ध खिरपानी येथे ‘माझा मित्र परिवार’ या समूहाचा वार्षिक स्नेहमिलन सोहळा द्वारकामाई बहुद्देशीय संस्थेच्या पुढाकाराने उत्साहात पार पडला.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा या स्नेहमिलनात सदस्यांनी एकत्र येऊन सामाजिक जाणीव, एकात्मता आणि परस्पर सहकार्य या मूल्यांना अधोरेखित करणारे विविध विषय चर्चिले.
या प्रसंगी वैभव खारोडे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत या समूहाच्या स्थापनेमागील उद्देश आणि सामाजिक उपक्रमांविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे आभार जयेश सैतवाल यांनी मानले.
या वेळी श्रीकांत रेचे, पवन उबरकर, कुलदीप कुकडे, निलेश देशमुख, निलेश गाडगे, मयूर श्रीवास्तव, सुरेश आडे, तुषार खारोडे, दीपक अढाऊ, विठ्ठल ढोले, स्वप्निल घुरडे, सक्षम पुनासे, अनुज अग्रवाल, अंकुश खारोडे, जितेंद्र पायघन, संजू पिंपळकर आदी मान्यवर उपस्थित होते
Users Today : 27