कुऱ्हा प्रतिनिधी
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस म्हणून ‘वॉक फॉर युनिटी’ कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक पोलीस ठाण्यात करण्यात आले.
या उपक्रमात पोलीस ठाण्याचे अधिकारी, अंमलदार, होमगार्ड, शांतता समिती सदस्य, शिक्षक, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या प्रसंगी उपस्थितांनी देशातील एकता, अखंडता आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देत समाजात ऐक्य आणि सौहार्द वाढविण्याचे आवाहन केले
Users Today : 27