चांदूरबाजार प्रतिनिधी
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त चांदूरबाजार येथे ‘रन फॉर युनिटी’ या उपक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. ही दौड क्रीडा संकुल चांदूरबाजार ते पोलीस स्टेशन चांदूरबाजार असा मार्ग घेत पार पडली.
देशाच्या एकता, अखंडता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले, अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली.
या प्रसंगी ठाणेदार अशोक जाधव, माजी नगरसेवक गोपाल तिरमारे यांच्यासह स्थानिक खेळाडू, पोलीस कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी देशाच्या एकतेसाठी योगदान देण्याचा संकल्प या वेळी व्यक्त केला.
Users Today : 27