ब्राह्मणवाडा थडी (ता. चांदूर बाजार) प्रतिनिधी
चांदूर बाजार तालुक्यातील गोविंदपूर ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालासाहेब बायस यांनी नुकतीच भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान प्रभावीपणे राबविण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी बायस यांनी गावातील विविध विकासकामांची आणि प्रत्यक्ष उपक्रम स्थळांची पाहणी करून अंमलबजावणी प्रक्रियेचा आढावा घेतला. त्यांनी ग्रामपंचायतीने राबविलेल्या योजनांचे दस्तऐवज तपासून कार्यक्षमतेत आणखी सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.
या प्रसंगी गटविकास अधिकारी डॉ. निलेश वानखडे, विस्तार अधिकारी रामागडे, सरपंच सोलव, ग्रामपंचायत अधिकारी रेखाते आदी मान्यवर उपस्थित होते.
या भेटीमुळे गोविंदपूर ग्रामपंचायतीच्या विकास उपक्रमांना चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
Users Today : 27