वरूड (प्रतिनिधी)
स्थानिक पंचायत समिती आणि महिला व बालकल्याण सेस फंड योजनेंतर्गत महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण ३८५ महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी २६ महिलांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे पाठविण्यात आले.
हे शिबिर पंचायत समिती फंडाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले होते. आरोग्य तपासणीसाठी शालिनी मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, वानाडोंगरी येथील डॉक्टर आणि त्यांच्या तज्ज्ञ पथकाने तपासणी केली.
शिबिरात जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका, पंचायत समिती कार्यालयातील महिला अधिकारी-कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका आदी महिलांनी सहभाग घेतला.
आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन गटविकास अधिकारी खुशाल पिल्लारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल देशमुख, प्रकल्प अधिकारी नयना इंगोले, विस्तार अधिकारी नितीन सुपले यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी संजय भेलाऊ, रोशन दारोकर, विलास दुपारे, संजय गव्हाणे, दीपक वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमातून महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता आणि नियमित तपासणीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. पंचायत समितीच्या वतीने या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला.
Users Today : 27