दर्यापूर (प्रतिनिधी)
देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन दर्यापूर शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने पोलीस विभागातर्फे एकात्मता आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देणारी भव्य रॅली काढण्यात आली.
ठाणेदार सुनील वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली पोलीस स्टेशन येथून प्रारंभ होऊन गांधी चौक, शिवाजी चौक मार्गे शहरात प्रदक्षिणा घालत समारोप करण्यात आला. रॅलीदरम्यान “एक भारत – श्रेष्ठ भारत”, “राष्ट्रीय एकता अमर राहो” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर देशभक्तीच्या जयघोषांनी दुमदुमला.
या रॅलीत पोलीस अमलदार, महिला पोलीस अमलदार, होमगार्ड कर्मचारी, समादेशक अधिकारी विनोद वाकपांजर, तसेच पीटीसी प्रवीण पातुरकर आणि दीपक फुटवाईक यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या उपक्रमातून देशभक्ती, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.
Users Today : 27