वरूड (प्रतिनिधी)
वरूड तालुक्यातील स्मार्ट ग्राम सावंगा येथे मुख्यमंत्री पंचायतराज अभियानांतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. संजिता महापात्र यांनी नुकतीच भेट देऊन ग्रामविकास कामांचा आढावा घेतला.
सदर भेटीदरम्यान त्यांनी सध्या सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली तसेच त्यामध्ये गुणवत्तावृद्धी आणि शाश्वत सुधारणा करण्याबाबत सूचना दिल्या. ग्रामस्थांचा, विशेषतः महिलांचा, सहभाग अभियानामध्ये अधिकाधिक कसा वाढविता येईल याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी वृक्षलागवड उपक्रम आणि मियावाकी प्रकल्पाचे प्रत्यक्ष निरीक्षण करण्यात आले. त्यांनी ग्रामपंचायतीच्या कार्यसंघाचे कौतुक करताना स्वच्छता, हरित ग्राम आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने अधिक प्रभावी पावले उचलण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी सावंगा ग्रामपंचायतीच्या सरपंच माया सोनागोती, उपसरपंच चेतन टेकाडे, सदस्य सविता आंडे, रमेश उईके, सतीश तट्टे, प्रगती कुरवाडे, देविका दोड, मुमताज शेख, भाग्यश्री आंडे, ग्रामपंचायत अधिकारी सरिता पुंड, तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी, शिक्षक, तलाठी, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका आणि बचत गट कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
तसेच गटविकास अधिकारी पिलारे, गटशिक्षणाधिकारी गाडे, बांधकाम अभियंता भारती रामटेके, कृषी अधिकारी सावळे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, विस्तार अधिकारी सुपले, तांत्रिक अधिकारी पांडव आणि स्वच्छ भारत मिशन गट समन्वयक स्वप्निल अळसपुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी महापात्र यांच्या भेटीमुळे गावात विकासाबद्दल सकारात्मकता आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Users Today : 27