कुऱ्हा (ता. तिवसा) प्रतिनिधी
तिवसा तालुक्यातील श्री तीर्थक्षेत्र कौंडण्यपूर येथील अवधूत महाराज चर्तुपती सेवा संस्थानतर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी २ ते ७ नोव्हेंबरदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमात पाच दिवसांची अवधूत भजनाची मांड तसेच अवधूत ज्ञानकथा होणार असून, ६ नोव्हेंबर रोजी सायं. ५ वाजता दहिहांडीचा कार्यक्रम पार पडणार आहे.
मंदिर परिसरात २ नोव्हेंबर रोजी पहाटे ५.३० वाजता उटी व गाय पूजन, सकाळी ६ वाजता चौघडा, तर दुपारी २ वाजता ह.भ.प. वासुदेव चोपकर यांचे कीर्तन कार्यक्रम होणार आहे. यावेळी परिसरातील मान्यवरांचा सत्कार समारंभही आयोजित करण्यात आला आहे.
७ नोव्हेंबर रोजी चौघडा, मांडीचा वाढवा, गायीचे पूजन तसेच महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल.
या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ सर्व भक्तांनी घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष रामदास नवल, उपाध्यक्ष राजन खारकर, सचिव विलास माहुरे, कोषाध्यक्ष वासुदेव चोपकर, सहसचिव शिशुपाल इखार, तसेच संचालक मुकुंद चाफले, वसंत लोखंडे, प्रमोद इंगोले, नामदेव बेलके, अवधूत शिरपुरे आणि लहानुजी वानखडे यांनी संयुक्तपणे केले आहे.
Users Today : 18