चांदूर रेल्वे प्रतिनिधी
अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ व गुरुवर्य आण्याजी महाराज आनंद मठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “बालसुसंस्कार दिवाळी निवासी शिबिराचा” समारोप नुकताच उत्साहात संपन्न झाला. हे शिबिर २६ ते ३० ऑक्टोबर दरम्यान श्रीदत्त मंदिर, आनंद मठ येथे दत्तगिर महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
या पाच दिवसीय शिबिरात विद्यार्थ्यांसाठी सामुदायिक ज्ञानवर्धन, परिसर स्वच्छता अभियान, योगासने, बौद्धिक तासिका, सामुदायिक प्रार्थना, राष्ट्रवंदना आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून बालकांना शारीरिक, बौद्धिक आणि नैतिक विकासाचे संस्कार देण्याचा प्रयत्न झाला.
शिबिरादरम्यान आचार्य हरिभाऊ वेरुळकर, विलास महाराज साबळे, राजाराम बोथे, प्रमोद गावंडे, किरण राऊत, विठ्ठल काठोडे, मंदा देशमुख, रवी चौधरी आदी मान्यवरांनी उपस्थित राहून मुलांना मार्गदर्शन केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अरुण कडू, प्रमोद गावंडे, रामदास डहाके, भास्कर अडसड, श्रीराम देशमुख, रामेश्वर वरघट, पवन गुल्हाने, आशा डोंगरे, शुभांगी वानरे, छाया भोयर, वैशाली कांडलकर, मिनल पवार, शुभांगी डेहनकर, प्रज्वल गुल्हाने आदींनी मोलाचे योगदान दिले.
या उपक्रमामुळे परिसरातील बालकांमध्ये सामाजिक बांधिलकी, अनुशासन व संस्कार मूल्यांची जोपासना झाली असून शिबिराचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Users Today : 18