वरूड प्रतिनिधी
स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, सायन्स अॅण्ड आर्टस, वरूड येथील बीबीए विभागातर्फे ‘करिअर इन बँकिंग’ या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून कॅनरा बँक, वरूड शाखेचे व्यवस्थापक हर्षानंद मेश्राम उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रातील विविध करिअर संधींबाबत माहिती देणे हे होते. यावेळी मेश्राम यांनी बँकिंग क्षेत्रातील नोकरीच्या विविध पदांबद्दल, आवश्यक शैक्षणिक पात्रता, कौशल्यविकास आणि स्पर्धा परीक्षांची तयारी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना मेहनत, प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास यांच्या बळावर उद्दिष्ट साध्य करण्याचे आवाहन केले.
विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सहभाग नोंदवत प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून मार्गदर्शकाशी संवाद साधला. कार्यक्रमाचे आयोजन बीबीए विभाग प्रमुख प्रा. चेतन गणोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या प्रसंगी प्रा. सौरभ आकोटकर, प्रा. आशिष शहाणे, प्रा. प्रफुल्ल बहुरूपी, प्रा. जान्हवी ढोले आदी प्राध्यापक उपस्थित होते.
Users Today : 18