अंजनगाव सुर्जी पोलिसांची मोठी कामगिरी — चार घरफोडी आरोपी अटकेत, पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

Khozmaster
2 Min Read

अंजनगाव सुर्जी प्रतिनिधी

अंजनगाव सुर्जी पोलिसांनी स्थानिक हद्दीत घरफोड्या करणाऱ्या चार आरोपींना अटक करून पाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार असून, त्याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.

अटक झालेल्या आरोपींची नावे अशी आहेत —
जुबेरोदिन कलिमोदिन (२२, रा. उस्माननगर अंजनगाव सुर्जी),
नुरोद्दीन उर्फ मुक्का नजमोद्दीन (२४, रा. अंजनगाव सुर्जी),
संतोष भाऊराव शिंदे (रा. मूर्तिजापूर) आणि
अब्दुल अतिक अब्दुल रफिक (रा. अलीमनगर, अमरावती).

यापैकी संतोष शिंदे आणि अब्दुल अतिक यांना काही दिवसांपूर्वीच अटक झाली होती आणि ते सध्या कारागृहात आहेत. या दोघांकडून सखोल चौकशी केली असता, त्यांनी शहरातील पाच ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली.

बुलेटवरून शहरात टेहळणी, नंतर चोरीचा बेत

चौकशीतून उघड झाले की, आरोपी हे बुलेटसारख्या महागड्या दुचाकीवरून शहरात फिरत, बंद असलेल्या घरांची टेहळणी करीत आणि नंतर घरफोडीची योजना आखत असत. चोरी केलेला माल विकून मिळालेल्या पैशांवर आरोपी मौजमजा करीत होते.

४ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

या टोळींकडून पोलिसांनी ४ लाख ८९ हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये दागिने, रोकड आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे.

पोलीसांची कारवाई

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सूरज बोंडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या मोहिमेत साहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज तेलगोटे, पोलीस कर्मचारी जयसिंग चव्हाण, मोहसीन पठाण, शुभम मार्कंड, आकाश रंगारी, अमित घाटे, अंकुश सयाम, विशाल थोरात, प्रमोद चव्हाण आणि दिपाली तेलगोटे यांनी सहभाग घेतला.

अंजनगाव सुर्जी पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी ही महत्त्वाची कामगिरी ठरली आहे.

0 8 9 4 5 2
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *