वाशिम प्रतिनिधी ;-
रिसोड
तालुक्यातील जय लखमा पॅरामेडिकल कॉलेज, रिसोड या संस्थेचा मोठा बोगस प्रकार उघडकीस आला असून, मान्यता नसतानाही प्रवेश देऊन विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे.
या कॉलेजने महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलची मान्यता असल्याचे खोटे दाखवून, अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांची शैक्षणिक आणि आर्थिक दोन्ही प्रकारे फसवणूक केली आहे.
तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल
येवती (ता. रिसोड) येथील विद्यार्थी नितेश गजानन जाधव यांनी या संस्थेविरोधात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद वाशिम* यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉलेजकडून विद्यार्थ्यांना सांगण्यात आले होते की “संस्थेला महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलची मान्यता आहे”. मात्र, रजिस्ट्रेशनसाठी प्रयत्न केल्यानंतर वास्तव समोर आले या कॉलेजला कोणतीही सरकारी अथवा विद्यापीठ मान्यता नाही.
थांबा थोडं… होईल लवकरच!” विद्यार्थ्यांची दिशाभूल
सुरुवातीला कॉलेज प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या शंकांवर “थांबा थोडं, लवकरच मान्यता मिळेल” असे सांगत *उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेली.
परंतु, आता विद्यार्थ्यांना थेट सांगितले जात आहे की रजिस्ट्रेशन होत नाही”, असा आरोप अर्जदार नितेश जाधव* यांनी केला आहे.
अजूनही अॅडमिशन सुरू — मोठ्या प्रमाणात लूट
दरम्यान, या कॉलेजमध्ये अजूनही नवीन प्रवेश प्रक्रिया सुरू असून, प्रशासन विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात फीस वसूल करत आहे.
यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात* ढकलले जात असल्याची तीव्र नाराजी पालक व विद्यार्थ्यांमध्ये व्यक्त होत आहे.
विद्यार्थ्यांचा इशारा “तोडफोड करू!
फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप असून, कॉलेजची तोडफोड करण्याचा इशारा विद्यार्थी नितीन जाधव* यांनी दिला आहे.
“आमच्या मेहनतीचे आणि भविष्यातील वर्षांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने तात्काळ कारवाई केली नाही तर विद्यार्थ्यांचा संयम सुटेल,” असे ते म्हणाले.
चौकशी आणि कारवाईची मागणी
स्थानिक विद्यार्थ्यांनी व पालकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की,
या बोगस संस्थेची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कडक कारवाई करण्यात यावी* तसेच *विद्यार्थ्यांना न्याय आणि परतावा द्यावा.
या घटनेमुळे रिसोड तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवावे, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
Users Today : 18