मेहकर नगरपालिका निवडणूक : अध्यक्षपदासाठी हाय व्होल्टेज चुरस

Khozmaster
2 Min Read

मेहकर प्रतिनिधी ;-
मेहकर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अध्यक्षपदासाठी हाय व्होल्टेज लढत रंगणार असल्याचे संकेत स्पष्ट झाले आहेत.
या वेळी अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने, सर्व प्रमुख राजकीय पक्ष आणि अनेक अपक्ष नेते या पदावर आपला दावा सादर करण्यास सज्ज झाले आहेत.
आजी-माजी आमदार, मंत्री आणि नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
या निवडणुकीत आजी-माजी आमदार, केंद्रीय मंत्री तसेच प्रदेश सरचिटणीस यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
काही उमेदवार थेट या नेत्यांच्या सानिध्यातून मैदानात उतरणार आहेत, तर काही स्वतंत्रपणे आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहेत.
त्यामुळे मेहकर नगरपालिकेची ही निवडणूक राजकीय रंगमंचावरील सर्वात लक्षवेधी सामना ठरणार आहे.
काँग्रेसमध्ये उमेदवार ठरवण्याचा निर्णय हाय कमांडकडे
काँग्रेसमध्ये नगराध्यक्षपदासाठी दोन प्रमुख इच्छुकांमध्ये चुरस दिसत आहे.
या दोघांपैकी अंतिम उमेदवार कोण, याचा निर्णय पक्षाच्या हाय कमांडकडे गेला असून १४ नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत निर्णयाची शक्यता वर्तवली जात आहे.
काँग्रेस पक्ष जातीय समीकरणाचे भान ठेवूनच उमेदवार जाहीर करणार, असे सूत्रांकडून समजते.
जातीय समीकरणांवर लक्ष, शह-मातचे राजकारण सुरू
भाजप, एमआयएम, काँग्रेस तसेच अनेक अपक्ष उमेदवारांनी विविध समाजघटकांना लक्षात घेऊन रणनीती आखली आहे.
अनेक ठिकाणी जातीय समीकरण बिघडवण्यासाठी अप्रत्यक्ष पाठिंबा आणि शह-मातचे खेळ रचले जाण्याची शक्यता आहे.
विश्वसनीय सूत्रांनुसार, यासाठी आवश्यक “राजकीय रसद” काही ठिकाणी आधीच पोहोचवली गेली आहे.
हाय व्होल्टेज निवडणुकीचं चित्र
या साऱ्या घडामोडी पाहता, मेहकर नगरपालिकेची निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक न राहता,
प्रादेशिक व राज्यस्तरीय नेतृत्वाच्या प्रतिष्ठेची कसोटी ठरणार आहे.
पुढील दोन दिवसांत उमेदवारी अर्जांच्या हालचालींनंतर या निवडणुकीचं राजकीय समीकरण आणि रंगत अधिक स्पष्ट होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

0 8 9 4 5 2
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *