जालना जिल्हा प्रतिनिधी, मंठा ;–
आज दिनांक 14 नोव्हेंबर रोजी बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने स्पष्ट बहुमत मिळवत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. या ऐतिहासिक विजयाचा आनंद मंठा शहरात भाजपच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर आणि भाजप प्रदेश सचिव राहुलभैय्या लोणीकर यांच्या सूचनेनुसार मंठा तालुका भाजपकडून फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला भाजप जिल्हा उपाध्यक्ष गणेशराव खवणे, माजी तालुकाध्यक्ष सतीश निर्वळ, विठ्ठल मामा काळे, कैलास बोराडे, नगराध्यक्ष वैजनाथ बोराडे, नगरसेवक दीपक बोराडे, युवा मोर्चा अध्यक्ष आनंद जाधव, नगरसेवक विकास सूर्यवंशी, एन. डी. दवणे, मनोज देशमुख, ए.टी. चव्हाण सर, डॉ. दत्तात्र्य काकडे, विकास जाधव, दिनेश सराफ, विनोद गायकवाड, सतीश बोराडे, दिलीप राठोड, पंकज राठोड, माणिक पवार, तोफीक कुरेशी, कपिल तिवारी, बद्रुद्दीन शेख, श्री चव्हाण, गोकुल राठोड, नंदू टकले यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट
भाजप तालुकाध्यक्ष नितीन राठोड यांचे प्रतिपादन
यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष नितीन राठोड म्हणाले—
“बिहार विधानसभा निवडणुकीतील विजय हा सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाचा आणि भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा परिपाक आहे. बिहारप्रमाणेच महाराष्ट्रात आणि मंठा तालुक्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही आमदार बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेश सचिव राहुलभैय्या लोणीकर यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी भव्य यश संपादन करेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजपच्या कार्यकर्त्यांच्या बळावर व सर्वसामान्य नागरिकांचा विजय – नितीन राठोड
0
8
9
4
5
2
Users Today : 18
Leave a comment