बुलढाणा “डिजिटल अरेस्ट” फसवणूक उघडकीस – सायबर पोलिसांची मोठी कामगिरी, 9.94 लाख रुपये परत!

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा प्रतिनिधी ;-

राज्यभरात वाढत असलेल्या “डिजिटल अरेस्ट” प्रकारातील अत्यंत गंभीर सायबर फसवणूक प्रकरणात बुलढाणा सायबर पोलीस स्टेशनने अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने तपास करून मोठी कामगिरी बजावली आहे. तक्रारदार विनोदकुमार उत्तमराव साळोक (42) व त्यांच्या पत्नीला खोट्या CBI आणि TRAI अधिकाऱ्यांच्या नावाने धमकावत आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप लावत तब्बल 10 लाख रुपये ऑनलाईन भरायला लावून फसवणूक करण्यात आली होती.
कशी झाली फसवणूक?
दि. 20 ते 24 ऑगस्ट 2025 दरम्यान अज्ञात व्यक्तींनी व्हॉट्सअॅप कॉलवरून तक्रारदार दांपत्याला “डिजिटल अरेस्ट”ची भीती दाखवली. त्यानंतर दबाव टाकून स्लोबल टिंबर्स नावाच्या एक्सिस बँक खात्यात आरटीजीएसद्वारे 10 लाख रुपये भरण्यास भाग पाडले.
त्यानुसार दि. 25 ऑगस्ट 2025 रोजी बुलढाणा सायबर पोलीस स्टेशनमध्ये अप. क्र. 41/2025 नोंदविण्यात आला. प्रकरणात भा. न्या. संहिता 2023 मधील कलम 204, 205, 318(2), 318(4), 319(2), 336(3), 340(2) तसेच IT Act कलम 66(C), 67(D) अंतर्गत गुन्हा दाखल झाला.
तांत्रिक तपासाने शोध लावला आरोपींच्या जाळ्याचा
पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांनी तातडीने बँकांशी संपर्क साधून फसवणूक झालेल्या रकमेचा माग काढला. पैसे विविध खात्यांमध्ये फिरवल्याचे समोर आले. त्वरित सर्व खाती गोठवण्याची (Freeze) प्रक्रिया सुरू करण्यात आली.
तांत्रिक विश्लेषणात पूर्ण रक्कम अखेरीस मिझोरम राज्यातील एका बँक खात्यात गेल्याचे निष्पन्न झाले.
सायबर पोलिसांची धमाकेदार कारवाई — रक्कम परत!
कौशल्यपूर्ण पद्धतीने काम करत सायबर पोलिसांनी त्या खात्यातील एकूण: ₹9,94,300/-
रक्कम गोठवून न्यायालयाच्या आदेशानुसार ती 12 नोव्हेंबर 2025 रोजी तक्रारदाराच्या खात्यात यशस्वीरित्या परत मिळवून दिली.
ही कारवाई बुलढाणा सायबर पोलिसांची राज्यातील एक उल्लेखनीय आणि प्रभावी कामगिरी ठरली आहे.
कोण होते पथकात?
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पथकाने केली:
पोलीस निरीक्षक प्रकाश सदगर
तपास अधिकारी पो. नि. संग्राम पाटील
सपोनि प्रमोद इंगळे
पोहेकॉ रामेश्वर मुंढे
प्रशांत गावंडे
राहुल इंगळे
केशव पुढे

0 8 9 4 5 0
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *